Narayan Rane : टिनपाटाच्या डब्याच्या चिरक्या ताशाच्या तडतडण्याचा दुसरा दिवस

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची खरमरीत टीका


मुंबई : 'टिनपाटाच्या डब्याच्या चिरक्या ताशाच्या तडतडण्याचा दुसरा दिवस' अशा आशयाचे ट्विट करत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मुलाखतीची खिल्ली उडवली आहे.


आता भाजपाचे हिंदुत्व तपासायची वेळ आली असे ते म्हणतात. आधी तुमचं स्वत:चं पहा. काँग्रेसच्या काळात इस्लाम खतरे में है अशा आरोळ्या ठोकल्या जात होत्या हेही तुम्हीच म्हणता आणि त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून आजही बसता. कुठे आहे तुमचे हिंदुत्व? मी स्वार्थासाठी पक्षाबाहेर जातो असे खरे सांगून जा असा उपदेश करणा-यांनी मी मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्व आणि साहेबांचे विचार सोडले हे सुध्दा स्पष्टपणे मान्य करावे.





भाजपमध्ये राम राहिला नाही, सगळे आयाराम-गयाराम म्हणणा-यांवर गावोगावी जाऊन दुस-या पक्षाच्या नेत्यांना शिवबंधन बांधण्याची वेळ का आली? महापौरांचे दालन मंत्रालयात ठेवायचे का विचारणा-यांनी स्वतः हडपलेल्या आलिशान महापौर बंगल्याचा हिशोब द्यावा. माझ्याकडे पक्षाचं नाव नाही, चिन्ह नाही, काहीही नाही म्हणणारे मणिपूर विषयावर माझी मदत घ्या म्हणतात. तुमचं अस्तित्वच काय?


पुतळे उभारून दुस-यांचे आदर्श चोरायचे म्हणणा-यांनी त्यांचे स्वतःचे आदर्श असलेल्या अटलजींचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास विरोध का केला याचे कारण जनतेला सांगावे. आज ते व्यापारी वृत्तीचा आरोप करतात. २०१४ ते २०१९ मध्ये सोबतीने काम करताना व्यापारी वृत्ती दिसली नाही का?


कोरोना काळातील कामाचे कौतुक करा म्हणणा-यांनी त्या काळात प्रेताच्या टाळूवटील लोणी खाल्ले, याचे कौतुक करायचे का? असे खरमरीत सवाल करीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांची पोलखोल केली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

'दशावतार' सिनेमा पाहिल्यावर काय म्हणाले राज ठाकरे? पाहा Video

मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या सिनेमाघरांमध्ये दशावतार या सिनेमाची चर्चा सुरू आहे. दशावतार सिनेमा

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने