मोहम्मद सिराजला दुखापत, एकदिवसीय मालिकेतून केले रिलीज

बार्बाडोस (वृत्तसंस्था) : दुखापतीचे ग्रहण टीम इंडियाची पाठ सोडत नसल्याचे दिसते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी गुरुवारी भारताचा वेगवान गोलदांज मोहम्मद सिराजचा घोटा दुखत असल्याने त्याला वन डे मालिकेतून रिलिज करण्यात आले. सिराजचा घोटा दुखत असल्याचे बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तसेच आशिया चषक आणि विश्वचषकामुळे सिराजला आराम मिळण्यासाठीही त्याला रिलिज करण्यात आल्याचे समजते.


मोहम्मद सिराजने मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी घोट्याच्या दुखण्याची तक्रार केली होती. यानंतर त्याला एकदिवसीय मालिकेतून मालिकेतून आराम देण्यात आला असल्याचे बीसीसीआयने सांगितले. मात्र, त्याच्या बदलीची घोषणा करण्यात आलेली नाही. बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, 'वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला सोडण्यात आले आहे. सिराजला घोट्यात दुखत असून खबरदारी म्हणून बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. सिराजला मायदेशी पाठवण्यात आलेय, मात्र बदली खेळाडू निवडण्यात आलेला नाही.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Rahul Dravid : बीसीसीआयकडून राहुल द्रविडचा सर्वोच्च सन्मान; शुभमन गिलचाही होणार विशेष सन्मान

- मुंबईचा आयुष म्हात्रे सर्वोत्तम ऑलराउंडर लाला अमरनाथ पुरस्काराने सन्मानित भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी आणि

Kuldeep Yadav Marriage: कुलदीप यादव लवकरच विवाहबंधनात अडकणार; कोण आहे कुलदीपची पत्नी?

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा 'चायनामैन' गोलंदाज कुलदीप यादव लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. कुलदीपची होणारी पत्नी

Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या 'त्या' कृतीवरून वाद; राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याने पुण्यात तक्रार

हार्दिक पांड्या याच्याविरोधात राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप करत पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अर्जुन आणि सानियाला दिल्या अमित शाह यांनी खास पत्रातून शुभेच्छा

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबाला विशेष

FIFA 2026 : फिफा २०२६ च्या विश्वचषकातून इराण बाहेर; फिफाने ठोठावला इराणला दंड

- या भ्रष्ट राजवटीने आमच्या नेत्याची हत्या केली, आम्ही कोणत्याही परिस्थितीत विश्वचषकात सहभागी होऊ शकत

IPL 2026 : आयपीएल२०२६ पर्वाचे वेळापत्रक जाहीर; आरसीबी आणि एसआरएचमध्ये होणार सलामीची लढत

मुंबई : आयपीएल २०२६ च्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) १९