नवी दिल्ली : अनेकदा अपयश पदरी पडलं की आपण आपल्या भाग्याला दोष देत राहतो. आपल्यात काय कमी असावं, याचा विचार मात्र फार थोडी लोकं करताना दिसतात. याला कोल्हापुरची रिया मात्र अपवाद ठरली आहे. सेलेब्रल पाल्सीसारख्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या जलतरणपटू रिया पाटीलने (Kolpaur Swimmer Riya Patil) उत्तुंग कामगिरी करत नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या सेरेब्रल पाल्सी स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया (CPSFI) स्पर्धेत स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडत एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदक जिंकले आहेत.
केंद्रीय क्रीडा सोबत युवक मंत्रालयाकडून आयोजित दिल्लीच्या डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्विमिंग पूल या ठिकाणी झालेल्या या स्पर्धेत रिया पाटीलने ही विक्रमी कामगिरी केली आहे. तिने १६ वर्षाखालील गटात ५० मीटर बॅक स्ट्रोक प्रकारात सुवर्णपदक तसेच दोन रौप्यपदकं पटकावली. १० राज्यांतील खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. तर याच स्पर्धेत सर्वाधिक पारितोषिकांसह चॅम्पियन ट्रॉफीचा किताब पटकावत महाराष्ट्र अव्वल ठरला आहे.
गेल्या वर्षी गुवाहाटी (Guwahati) येथे झालेल्या नॅशनल पॅरालिम्पिक स्विमिंग स्पर्धेत रिया पाटीलने ५० मीटर फ्री स्टाईलमध्ये १ मिनिट ५७ सेकंदांची कामगिरी नोंदवली होती. तर १०० मीटर फ्री स्टाईलमध्ये ४ मिनीटे १२ सेकंदाची कामगिरी नोंदवली होती. आता तिने स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडत ५० मीटर फ्री स्टाईलमध्ये १ मिनीट ४७ सेकंद तर १०० मीटर फ्री स्टाईलमध्ये ४ मिनीटे ५ सेकंदाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गुवाहाटी येथे झालेल्या स्पर्धेत रिया पाटीलने सब-ज्युनिअर स्विमिंग स्पर्धेत तीन सुवर्णपदकांसह बेस्ट स्विमरचा खिताब पटकावला होता. तसेच त्या स्पर्धेत रिया पाटील ही सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली होती.
रियाच्या या यशामुळे तिने सर्वांसमोरच एक उत्तम आदर्श घालून ठेवला आहे. आपल्यासमोर असलेल्या अडचणींचा बाऊ न करता त्यावर यशस्वीपणे मात करायला शिकलं पाहिजे, हे आपल्याला रियाचं यश सांगून जातं.
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…
ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…
पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…
पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…