Aashish Shelar : बाळासाहेब डागायचे ते काडतूस, हे तर टमरेल! फडतूस!!

  144

‘कसली मुलाखत ही तर जळजळ, मळमळ अन् अपचनाचे करपट ढेकर’


मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांचा ठाकरेंवर पलटवार


मुंबई : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackaray) यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारसह राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टोमणे मारुन हल्लाबोल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यांच्या या टीकेवर आता भाजप नेते आक्रमक झाले असून त्यांनीही ठाकरेंच्या टोमण्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.


महाराष्ट्राच्या जनमताशी ज्यांनी बेईमानी केली ते इमानदार कसे? कितीही मुलाखती दिल्या तरी बेईमानीच पुसणार नाहीत आता ते ठसे! ही कसली मुलाखत… ही तर जळजळ, मळमळ आणि अपचनाचे करपट ढेकर. स्वतःचा पक्ष, सरकार न सांभाळायच्या कलंकातून बाहेर पडण्याची धडपड!! असे ट्विट करत मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार (Aashish Shelar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.





भरलेल्या डालड्याचा डबा उपयोगाला तरी येतो रिकामा डबा टमरेल ठरतो! एक काळ मुलाखतीतून वंदनीय हिंदुहृहयसम्राट बाळासाहेब ठाकरे डागायचे ते असे काडतूस हल्ली सगळं फडतूस, फडतूस आणि फडतूस!!! असे ट्विट शेलार यांनी केले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

मुंबईत सकाळी मुसळधार पाऊस, तासाभरात २० मिमी. पावसाची नोंद

मुंबई : मागच्या आठवड्याच्या सुरुवातीला पावसानं मुंबईला झोडपलं. यानंतर चार दिवस विश्रांती घेऊन पाऊस पुन्हा हजर

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना

Health: मुलांची उंची आणि चांगले आरोग्य वाढवण्यासाठी उपयुक्त पदार्थ

मुंबई : मुलांच्या योग्य शारीरिक वाढीसाठी त्यांना योग्य आहार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः त्यांची उंची

Mumbai Rain Update: चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह उपनगरात पावसाचा पुन्हा जोर

मुंबई: बाप्पाच्या आगमनाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना मुंबईसह उपनगरात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५