नवी दिल्ली : कोरोना विषाणू महामारी (Corona Virus Pandemic) आटोक्यात आली असली तरी त्यासारख्या इतर विषाणूंचा धोका (MERS-CoV) मात्र जगभरात कायम असल्याचे दिसून येत आहे. कोरोनानंतर आता MERS-CoV हा व्हायरस डोकं वर काढत असून आतापर्यंत २७ देशांमध्ये त्याचा प्रसार झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या व्हायरसवर अद्याप कोणतीही लस शोधण्यात आलेली नाही. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) दिलेल्या माहितीनुसार, अबुधाबीमध्ये MERS-CoV या व्हायरसचे रुग्ण सापडत आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, एका २० वर्षीय तरूणाला संसर्ग झाल्यानंतर गेल्या महिन्यात अबू धाबीमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोनाव्हायरस (MERS-CoV) या आजाराने ग्रस्त असल्याचे तपासात समोर आले आहे.
डब्ल्यूएचओने पीडितेच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची देखील तपासणी केली आहे. परंतु व्हायरस कुठून पसरला हे माहित नाही. हा विषाणू प्रामुख्याने उंटांसारख्या प्राण्यांद्वारे प्रसारित केला जातो, असे मानले जात आहे.
डब्ल्यूएचओने या नव्या व्हायरसला मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोनाव्हायरस (MERS-CoV) असे नाव दिले आहे. सौदी अरेबियामध्ये २०१२ मध्ये पहिल्यांदा हा व्हायरस आढळल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत हा व्हायरस २७ हून अधिक देशांमध्ये आढळला आहे.
यामध्ये पश्चिम आशियातील देश तसेच फ्रान्स, जर्मनी, इटली, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यासारख्या देशांचा समावेश आहे. डब्ल्यूएचओच्या मते आतापर्यंत एकूण २ हजार ६०५ प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यापैकी ९३६ मरण पावले आहेत.
हा व्हायरस प्राणी आणि लोकांमध्ये पसरणारा एक झुटोनिक विषाणू आहे. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, सौदी अरेबियातील लोकांना बहुतेक संक्रमित उंटांच्या असुरक्षित संपर्कामुळे या व्हायरसची लागण झाली आहे.
MERS-CoV विषाणूची लक्षणे
१. ताप
२. खोकला
३. श्वास घेण्यामध्ये अडथळा
४. काही प्रकरणांमध्ये न्यूमोनिया देखील होतो.
MERS-CoV विषाणूवरील उपचार
या विषाणूचा नायनाट करण्यासाठी अद्याप कोणताही निश्चित उपचार नाही. या विषाणूच्या लसींवर काम सुरू असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सांगितले आहे.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…