मुंबई : मुंबईतील (MumbaI) अंधेरी पूर्व चकाला (Chakala) परिसरात मध्यरात्री रामबाग सोसायटीत दरड कोसळल्याची दुर्घटना ताजी असतानाच जोगेश्वरी येथील मेघवाडी (Meghwadi) परिसरातल्या पीपल्स वेल्फेअर इंग्लिश हायस्कूलमधील लॅबची गॅलरी आज सकाळी ६.४५ च्या सुमारास कोसळली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाली नसल्याचे माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली. मुंबईत सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यामुळे अनेक दुर्घटना घडत आहे.