Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीLove beyond boundaries : सात समुंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ...

Love beyond boundaries : सात समुंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ गई, सीमानंतर राजस्थानची अंजू प्यार के लिए पाकिस्तान पहुँच गई…

नवर्‍याला मात्र काहीच माहित नाही…

राजस्थान : ‘सात समुंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ गई’ हे गाणं आता फक्त मजेपुरता मर्यादित राहिलं नसून खरंच प्रेयसी आपल्या प्रेमाला भेटण्याकरता कठीण कठीण डोंगर पार करत थेट दुस-या देशाच्या सीमा ओलांडून येत आहेत. सोशल माडियावर (Social Media) असं सीमेपलीकडचं प्रेम (Love beyond boundaries) सध्या चांगलंच चर्चेत आहे. नव-याला काहीच माहित नसताना या महिला मात्र ‘परदेसिया यह सच है पिया, मैं कहती हूँ तुने मेरा दिल ले लिया’ म्हणत परदेशी असणा-या त्यांच्या प्रियकराकडे धाव घेत आहेत. सध्या गाजत असलेलं ‘सीमा हैदरचं प्रकरण’ हे त्यापैकीच एक. त्यातच आता आणखी एका प्रकरणाची (Social Media Lovestory) भर पडली आहे.

सीमा भारताच्या सीमा ओलांडून थेट आत शिरल्याने भारताच्या सीमासुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतो आहे. मात्र अशातच आता आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी थेट नेपाळहून आपल्या चार मुलांसह भारतात आलेल्या सीमा हैदरच्या प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. यावेळी महिला पाकिस्तानातून भारतात आली नसून भारतातील महिला आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी थेट पाकिस्तानात पोहोचली आहे. (Anju from Rajsthan went to pakistan to meet her boyfriend.)

राजस्थानमधील (Rajasthan) अलवर जिल्ह्यातील भिवडी येथील अंजू (Anju) ही महिला प्रियकराला भेटण्यासाठी पती आणि मुलांना सोडून पाकिस्तानात गेली आहे. दुसरीकडे तिच्या नवर्‍याला मात्र याबाबत काहीच माहित नाही. आपल्या प्रेमाखातर काहीही करु शकणार्‍या या महिलांमुळे मात्र देशांच्या सीमासुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतो आहे. एकीकडे भारत-पाकिस्तानमध्ये सातत्याने तणावाची स्थिती निर्माण होत असताना या दोन देशांतील प्रेमप्रकरणं ही चर्चेचा विषय ठरत आहेत.

नेमकी कशी पोहोचली अंजू पाकिस्तानात?

मूळच्या मध्य प्रदेशातील असलेल्या अंजूचा विवाह २००७ मध्ये उत्तर प्रदेशमधील अरविंदसोबत झाला. ती पतीसोबत राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात राहते. अंजूने हिंदू धर्म स्वीकारला होता आणि नंतर तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. अंजूला दोन मुलं देखील आहेत. अंजू ही पाकिस्तानातील लाहोरमध्ये राहणाऱ्या तरुणाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलत होती. हा तरुण म्हणजेच अंजूचा प्रियकर नसरुल्ला खैबर हा पाकिस्तानमधील पख्तूनख्वाच्या दीर जिल्ह्यातील रहिवाशी आहे. अंजू आणि नसरुल्लाह यांची फेसबुकवर मैत्री झाली आणि दोघेही तासनतास सोशल मीडियावर बोलू लागले. यानंतर अंजूने नसरुल्लाह याला भेटण्यासाठी पाकिस्तानला जायचं ठरवलं.

घरी जयपूरला सहलीला जात असल्याचं सांगून अंजू पाकिस्तानात पोहोचली. अंजूच्या पासपोर्टवरील नोंदीवरून, ती २१ जुलैला व्हिजिट व्हिसावर पाकिस्तानला पोहोचल्याचे समजत आहे. भारतीय महिला पाकिस्तानात पोहचल्याने पाकिस्तानी एजन्सी अलर्ट झाली आहे. अंजू पाकिस्तानात का आली, याबाबत पाकिस्तानी यंत्रणेकडून चौकशी करण्यात आली आहे. अंजूने नसरुल्लाह याला भेटण्यासाठी आल्याचं सांगितलं आहे. नसरुल्लाह हा दीर जिल्ह्यात मेडिकल रिप्रेझेनटेटिव्ह म्हणून काम करतो.

अंजूचा नवरा म्हणतो.. मला काहीच माहित नाही..

अंजूचा पती अरविंदने सांगितलं, अंजू चार दिवसांपूर्वी सहलीसाठी जयपूरला जाते सांगून घरातून निघाली होती. त्यानंतर ती नक्की कुठे गेली याची माहिती नाही, पण काही दिवसांत ती परत येईल असा विश्वास अंजूच्या पतीने व्यक्त केला. अरविंदच्या म्हणण्यानुसार, अंजू व्हॉट्सअप कॉलिंगद्वारे (Whatsapp Call) सतत त्याच्या (अरविंदच्या) संपर्कात असते. रविवारीही तिने व्हॉट्सअप कॉल केला होता.

अंजूचा पती हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवाशी आहे. २००७ पासून तो पत्नीबरोबर राज्स्थानच्या भिवडीतील टेरा प्रौढ सोसायटीत भाड्याने राहतो. भिवडीत तो डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करतो. तर त्याची पत्नी अंजू ही होंडा कंपनीत काम करते.

पोलिसांचा तपास सुरु

ती पाकिस्तानात पोहोचल्याची माहिती मिळताच पोलिसांचं पथक अंजूच्या घरी दाखल झालं. पोलिसांनी तिच्या पतीकडे चौकशी केली असता त्याला याबाबतची कल्पना नव्हती. पण अंजू दोन-तीन दिवसांत घरी परतेल, असं त्याचं म्हणणं आहे. आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी ती पाकिस्तानात गेल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. मात्र ती पाकिस्तानात कशी पोहोचली, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, अंजू नावाची भारतीय महिला लाहोरला खैबर पख्तून परिसरात नसरुल्लाह नावाच्या तरुणासोबत राहत असल्याचं पत्र मिळालं आहे. यासंदर्भात महिलेशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसाकडून या प्रकरणाचा तपास गांभीर्याने सुरू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -