Irshalwadi Victims rehabilitation : उद्यापासून इर्शाळवाडीतील बचावकार्य थांबवणार

उदय सामंतांनी दिली माहिती


रायगड : इर्शाळवाडीत झालेल्या दुर्घटनेमुळे (Irshalwadi Landslide) अख्खा महाराष्ट्रच हादरला आहे. राज्यभरातून अनेक ठिकाणांहून दुर्घटनाग्रस्तांसाठी मदत पाठवली जात आहे. घटनेला तीन दिवस झाले असले तरी अजूनही बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र याबाबत रायगडचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samat) यांनी आज पत्रकारांशी बोलताना एक माहिती दिली आहे. उद्यापासून इर्शाळवाडीतील बचावकार्य बंद करण्यात येईल, परंतु या ठिकाणी जी मुलं अनाथ झाली आहेत, त्यांचा सरकार गांभीर्याने विचार करेल, असं उदय सामंत यावेळी म्हणाले.


इर्शाळवाडीसारख्या दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ज्या काही उपापयोजना करणे गरजेचे आहे, त्या केल्या जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी योग्य ती मदत जाहीर केली आहे. परंतु यातील भयावह, दुःखदायक आणि क्लेशदायक बाब म्हणजे २२ मुले अनाथ झाली आहेत. त्यांच्यासाठी काहीतरी करावंच लागेल. हा प्रसंग खूप जलद गतीने झाला त्यामुळे कोणताही निर्णय घेणं कठीण आहे. मात्र दुर्घटनाग्रस्त अनाथ मुलं किंवा इतर लोकांनाही शासन वार्‍यावर सोडणार नाही, हा माझा पालकमंत्री म्हणून शब्द आहे, असं उदय सामंत म्हणाले.


कलम १४४ नुसार इर्शाळगडावर येण्यास जी बंदी घातली आहे, ती आणखी वाढणार किंवा किती दिवस राहणार याबाबतचा संपूर्ण निर्णय जिल्हाधिकार्‍यांचा राहील, असं उदय सामंत यांनी सांगितलं. तसेच सर्व दुर्घटनाग्रस्तांची आज संध्याकाळपर्यंत तात्पुरत्या राहण्याची व्यवस्था होईल. डायमंड पेट्रोल पम्प येथे तात्पुरती जागा घेण्यात आली आहे व तिथे कंटेनरमध्ये त्यांना शिफ्ट करण्यात येईल. युद्धपातळीवर, कुठेही एक-दोन वर्षे वाया न घालवता त्यांचं पुनर्वसन चांगल्या घरांमध्ये करण्यात येईल, असा विश्वास उदय सामंत यांनी दिला.


मृतांचा आणि जखमींचा आकडा

दरम्यान,  रायगडमधील इर्शाळवाडी दरड दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा आतापर्यंत २९ इतका झाला आहे. तर ५२ जण अद्याप बेपत्ता आहेत. या ठिकाणी आजही बचाव मोहीम सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचे नाव

 मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ मुंबई : कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि देशाचे

जहाज बांधणी क्षेत्रात २०३० पर्यंत ४० हजार नोकऱ्या- मंत्री नितेश राणे

रत्नागिरी, रायगड आणि पालघरच्या किनाऱ्यावर उभे राहणार विशाल 'शिप बिल्डिंग' प्रकल्प मुंबई (सुहास शेलार) :

Kokan Railway News : कोकणवासियांसाठी खुशखबर! पावसाळ्यापूर्वी कोकण रेल्वेची मोठी तयारी, युद्धपातळीवर कामे सुरू

नवी मुंबई : कोकणवासियांसाठी आणि कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची