मुंबई : आज सकाळपासून मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, दिवा, कळवा, मुंब्रा या परिसरामध्ये जोरदार पाऊस (Rain updates) सुरु आहे. अनेक सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
अंधेरी सबवे खाली तीन ते चार फूट पाणी भरल्यामुळं अंधेरी सबवे वाहनांसाठी व इतर नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे. मुंबईच्या एलबीएस मार्गावरील वाहतुकही मोठ्या प्रमाणावर मंदावलेली पहायला मिळाली.
अर्धवट राहिलेल्या रस्त्यांच्या कामामुळे ठाण्यातील वागळे स्टेट परिसरात ठाण्याहून मुंबईच्या दिशेने आणि मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
दरम्यान मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांत पुढील तीन ते चार तास मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई आणि ठाण्यासह नवी मुंबई कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ बदलापूरमध्ये देखील मुसळधार पाऊस हा पडत आहे. कल्याण डोंबिवली मध्ये रात्रभर पाऊस कोसळत होता. सकाळी तासाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…