
दापोली : बोरिवली येथून दापोलीकडे येणा-या बस क्र एमएच १४ बीटी ३९७२ या गाडीला दापोली मंडणगड मार्गावरील लाटवण फाटा येथे आज अपघात झाला. या अपघातात चालक वाहक किरकोळ जखमी झाले आहेत. टेम्पो चालकाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला दापोली उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे.
एसटी चालक श्रीकृष्ण बाबुराव शेळके व वाहक गोविंद रामा मेटकर हे बोरिवली दापोली गाडी घेऊन येत असता आयशर टेम्पो एमएच १९ झेड ६८६७ यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.