मुंबई (प्रतिनिधी): मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा कंदील दाखवलेली मुंबई ते मडगाव दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस आजपासून नियमित धावण्यास सज्ज झाली आहे. आज पहिल्याच दिवशी या गाडीला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून मंगळवारपासून या गाडीचे आरक्षण सुरु झाले व अवघ्या दोन दिवसात ही गाडी संगणकीय आरक्षणाद्वारे ९० टक्के भरली असल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.
आज पहिल्याच दिवशी ही गाडी ९० टक्के भरली असून ५३० आसनांपैकी ४७७ आसने आरक्षित झालेली आहेत. या पहिल्याच फेरीमुळे रेल्वेला ६, ४८ लाखांचा महसूल मिळाला असूनतसेच येणाऱ्या गणपती काळात १५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या काळात तब्ब्ल ११० टक्के आरक्षण प्रवाशांनी केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले .
नियमित ही मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस (आठवड्याचे ६ दिवस) शुक्रवार वगळता चालवण्यात येणार असून २२२२९ सीएसएमटी मुंबईहून सकाळी ५. २५ वाजता निघेल आणि मडगावला दुपारी१३.३० वाजता पोहोचेल. तर २२२३० मडगावहून १४. ४० वाजता निघेल आणि रात्री १०.२५वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल. मान्सून वेळापत्रकानुसार ही गाडी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी ५. २५ वाजता सीएसएमटी मुंबईहून निघेल आणि मडगावला दुपारी १५. ३० वाजता पोहोचेल. तर मडगावहून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी दुपारी१२. २० वाजता सुटेल आणि रात्री १०.२५वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा , खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम या स्थानकांवर थांबेल.