Surekha Vani : ड्रग्जच्या विळख्यात? व्यसनाधीन व्यक्तीशी संपर्क?

काय म्हणाली अभिनेत्री सुरेखा वाणी?


तामिळनाडू : सुरेखा वाणी (Surekha Vani)ही तेलुगु चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चरित्र अभिनेत्री आहे. तीने तामिळमध्ये जिला, उथमपुत्रनसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तेलगू चित्रपट निर्माते के. पी. चौधरी याला नुकतीच अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून चौधरी हा चित्रपट सेलिब्रेटींना ड्रग्ज पुरवत असल्याचे आरोप झाले होते.



सुरेखा वाणीचा के. पी. चौधरीसोबतचा (K P Chowdhary) क्लोजअप फोटोही प्रसिद्ध झाला. त्यामुळे सुरेखा वाणी या ड्रग्ज प्रकरणाशी जोडली गेली आणि ही बातमी वा-यासारखी सोशल मीडियात पसरल्याने खळबळ उडाली.



सुरेखा वाणी हिने याबाबतचा खुलासा करणारा व्हिडिओ जारी केला आहे. ज्यामध्ये ती म्हणते, ‘माझ्यावर काही काळापासून खोटे आरोप होत आहेत. याचा आम्हाला खूप फटका बसतो. या वादाशी आमचा काहीही संबंध नाही. माझे चित्रपट कारकीर्द, माझ्या मुलांचे भविष्य, माझे कुटुंब आणि आमच्या आरोग्यावर अशा अफवांचा खूप परिणाम होतो. कृपया आमच्याशी संबंधित अशा अफवा पसरवणे थांबवा. आम्हाला समजून घ्या.” असे कळकळीचे आवाहन तिने केले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Narendra Modi : नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, NTA च्या ४७ अधिकाऱ्यांची हकालपट्टी

नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणी मोदी सरकारने मोठी कारवाई केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र

Supreme Court : लाठीचार्जविरोधातील दोन याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात २७ जुलैला सुनावणी

नवी दिल्ली: पेपर लीक प्रकरणाविरोधात रस्त्यावर उतरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर

Kusha’ missile : लांब पल्ल्याच्या ‘कुशा’ क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी चाचणी

भारताची ऐतिहासिक झेप ; हवाई सुरक्षा यंत्रणा होणार अधिक मजबूत नवी दिल्ली : भारत आपली हवाई सुरक्षा यंत्रणा आणखी

Shimla Accident : हिमाचलमध्ये कारवर दरड कोसळली, १३ जणांचा मृत्यू तर सहा महिन्याच्या बाळाचा...

शिमला : हिमाचल प्रदेशमधील लाहौल स्पीती परिसरातील पांगी-उदयपूर मार्गावर दुपारी एक दुर्दैवी घटना घडली आहे.

Major Supreme Court decision : न्यायालयाच्या कामकाजाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यास बंदी, परवानगीशिवाय शेअर केल्यास होणार कारवाई

नवी दिल्ली: न्यायालयीन कामकाजाचे व्हिडिओ, ऑडिओ क्लिप्स आणि थेट प्रक्षेपणाचे (लाइव्ह-स्ट्रीम) चित्रीकरण

Zero's History : शून्याचा पहिला पुरावा कुठे सापडला? भारतातील 'या' प्राचीन मंदिराचा इतिहास जाणून घ्या

दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अंकांमध्ये शून्य (Zero) हा सर्वात महत्त्वाचा अंक मानला जातो. बँकिंग (Banking), संगणक (Computer),