उद्धव ठाकरेंवर आमदार नितेश राणेंचा हल्लाबोल
मुंबई : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आजच्या पत्रकार परिषदेत संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. बांद्रा रेल्वे स्थानकाजवळची शाखा तोडली म्हणून बाळासाहेबांचा फोटो तोडल्याचा बनाव करुन काल महापालिका अधिका-यांना मारहाण केली. मग संजय राजाराम राऊतच्या मालकाने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मातोश्री-२ अधिकृत करून घेतली पण त्याआधी मुंबईतल्या अनधिकृत शाखा का नाही अधिकृत करून घेतल्या, असा सवाल करत भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर थेट हल्लाबोल केला.
मातोश्री पासून हाकेच्या अंतरावर असलेली शाखा तोडली जाते आणि अनिल परब आणि लोक शेंबड्या पोरांसारखे मोर्चा काढण्याचे ढोंग करतात. अधिका-यांना मारहाण करतात. ते म्हणत आहेत की आदेश वर्षामधून निघाले. मग तुमच्या मालकाने महिलांना त्रास दिला. कंगनाचे घर, कार्यालय तोडायला लावले. नवनीत राणाच्या घरावर कारवाई करायला गेले. राणेंचा बंगला तोडण्यासाठी किती फोन केले. या सर्वांची लायकी काय आहे ते सगळ्यांना माहित आहे. उद्धव ठाकरेंच्या नाकासमोर अनधिकृत बांधकाम होत असताना गेल्या २५ वर्षात तुम्ही काय केले. अनिल परबला ५ मते मिळू शकत नाहीत. येणा-या निवडणुकीत साधं नगरसेवक म्हणून तरी निवडणूक लढव, मग कळेल. यांना कोणीही विचारत नाही तेव्हा अशी नाटकं करुन प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. पण लोकांना सर्व माहित आहे. बाळासाहेबांचा फोटो काढायला महापालिका अधिका-यांनी परवानगी दिली होती. त्यांनी फोटो तोडलेला नाही.
हिम्मत असेल तर अनिल परब याने नगरपालिकेची निवडणूक लढवून दाखवावी त्याला पाच मते मिळणार नाहीत. ज्याची पाच मतांची लायकी नाही त्याला उद्धव ठाकरेंचा कार्यकर्ता म्हणतात.
राऊत शुद्धीत आहे का?
तू तुझ्या मालकाचा पक्ष आणि मुलगा हे भाजपा सोबत असताना इतर राज्यात निवडणुका लढविल्या आहेत. थोबाड रंगवायला जायचे ना तिकडे.
आज सकाळी तेलंगणाचे मुख्यमंत्री विठ्ठलाच्या दर्शनाला आले होते. तेलंगणाच्या मुख्यमंत्री यांनी हिंदूंच्या देवाचे दर्शन घेतले म्हणून त्यांच्या पोटात पोटशूळ उठतोय. केसीआर ही भाजपाची दुसरी टीम आहे असे म्हणणाऱ्यांना हे झोंबलं. पण उबाटा राष्ट्रवादीची ढ टीम आहे.
काल शाखा तोडली त्यावर स्वस्त असलेल्या शिवसेनेच्या सिंबलने आरडाओरड केली. पालिका अधिकाऱ्यांनी फोटो तोडण्याअगोदर काढण्याची परवानगी दिली होती. पण हे लोकांच्या डोळ्यात धूळ फेक करण्याचे काम करतात. लोकांची घरे तोडलीत तुम्हाला आठवण आहे का? की तुम्ही गजनी झालात?
तेव्हा आदेश वर्षावरून यायचे
सर्वात मोठा नीच मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसतो. स्वतःच्या घराबद्धल विचार केला मग शाखांचा विचार का नाही केला? त्या नियमित का नाही केल्या?
ज्या भागात मातोश्री आहे. त्याच विभागात महिला भगिनींना पाण्यासाठी मोर्चा काढावा लागतो ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.
त्या सर्व अनधिकृत बांधकामाना उद्धव ठाकरेचा आशीर्वाद होता का?
ज्यांनी ज्यांनी अधिकाऱ्यांवर हात उचलला त्यांच्यावर कारवाई होणारच
याच उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावे..
उद्धव ठाकरेंना हा प्रश्न विचारा - प्रकाश आंबेडकर जे हिंदूंची बदनामी करतात, छत्रपतीxची बदनामी करतात त्यांच्या सोबत तुम्ही युती करता?
प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत आम्ही मांडीला मांडी लावून बसत नाही जे त्यांच्या सोबत बसतात त्यांना विचारा.
जे जे उद्धव ठाकरेंशी निगडित आहेत त्यांना दंगली घडवायचा प्रयत्न आहे. म्हणून उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट व्हावी, अशी माझी जूनी मागणी आहे.
शरद पवार यांच्या बाबत बोलणे टाळले. मात्र फडणवीस साहेब प्रश्न विचारतात त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळावी, ही अपेक्षा.
जे दुसऱ्यांची घरे तोडण्यासाठी, केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्यासाठी पुढे असायचा त्याला कायदा समजेल, अनिल परब अनधिकृत बांधकामाविरोधात आंदोलन करतो, यालाच नियती म्हणतात.