Nandurbar Municipality Schools : 'या' कारणामुळे नंदुरबारमध्ये अनेक पालकांचा सरकारी शाळांकडे ओढा

राज्यात १२०० हून आधिक विद्यार्थी खाजगीमधून जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल


नंदुरबार : राज्यभरात अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये (Government Schools) विद्यार्थ्यांच्या संख्येला गळती लागल्याचे म्हटले जाते. अनेक आंतरदेशीय शाळा तिथल्या सोयीसुविधांमुळे पालकांना आकर्षित करतात आणि कधीकधी तेवढी क्षमता नसतानाही पालक आपल्या पाल्याला अशा शाळांमध्ये दाखल करतात. याचं एक कारण म्हणजे अशा शाळांमध्ये उपलब्ध असणारं आधुनिक प्रकारचं डिजीटल शिक्षण. याच पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देखील डिजिटल शिक्षण मिळावे, याकरता नंदुरबार नगरपालिकेने (Nandurbar Municipality) मोठे पाऊल उचलले. यामुळे पालकदेखील सरकारी शाळांकडे वळत आहेत व चित्र बदलत आहे.


शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा यासाठी नंदुरबार नगरपालिकेने या शैक्षणिक वर्षात नगर पालिकेच्या १२ शाळांपैकी पाच शाळांमधील एक वर्गखोली डिजिटल (Digital classroom) करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी झाली असून यामुळे विद्यार्थ्यांना आता आधुनिक शिक्षण घेता येणार आहे. पालिकेच्या शाळांमधील हे दर्जेदार शिक्षण आपल्या पाल्यांना देण्यासाठी पालकांचा ओढा पालिकेच्या शाळांकडे वाढल्याचे दिसत आहे.



डिजिटल वर्गखोलीसाठी ४० लाखांचा निधी

हा निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) सी एस आर फंडातून (CSR Fund) ४० लाखांची मदत मिळवली. या निधीतून नगर पालिकेच्या १२ शाळांमधून ५ शाळांमधील प्रत्येकी एक खोली डिजिटल करण्यात आली आहे. प्रत्येक खोलीसाठी आठ लाखाचा खर्च आला आहे.



डिजिटल वर्गखोलीत काय सुविधा असणार?

या डिजिटल क्लासरूम साठी ६५ इंची डिजिटल टीव्ही (Digital TV) ,प्रोजेक्टर (Projector), १० बेंचेस, कार्पेट अशा आधुनिक वस्तू देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम किंवा एखाद्या विषयाबाबत पडणारे प्रश्न या डिजिटल स्वरूपाच्या माध्यमातून सहज सोडवता येतील असे मुख्याधिकारींनी सांगितले.



पालकांचा जिल्हा परिषद शाळेकडे कल

कोविड काळात फी भरली नाही तर ऑनलाइन शिक्षणही नाही असा मार्ग बहूतांशी खाजगी शाळांनी निवडला. दुसरीकडे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शक्य तिथे ऑनलाइन तर जिथे शक्य नाही तेथे ऑफलाईन पद्धतीने शिक्षण देत होते. मोफत शिक्षण, प्रत्यक्ष संवाद, गुणवत्ता सुधार, सेमी इंग्रजी यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश वाढू लागले आहेत. यावर्षी १२०० हून अधिक विद्यार्थ्यांनी खाजगी शाळांमधून जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेतल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच नंदुरबार नगरपालिकेसारखे आधुनिक आणि शैक्षणिक उपक्रम राज्यातील अनेक शाळांनी राबवले तर शाळा बंद पडणार नाहीत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

धक्कादायक! एसटीचे ७ कर्मचारी दारू पिऊन ड्युटीवर!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कारवाईचा बडगा मुंबई : अचानक केलेल्या तपासणीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना