Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणेंची सोमवारी राजापुरात सभा

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची रणनीती


राजापूर : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच आपल्या कार्यकाळाची ९ वर्षे पूर्ण केली. यानिमित्त देशभरात 'मोदी@९' (Modi@9) जनसंपर्क अभियान राबवण्यात येत असून अनेक ठिकाणी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते पंतप्रधानांनी केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. महाराष्ट्रात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नांदेड तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नाशिकमध्ये सभा घेतल्यानंतर आता केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर (Rajapur) तालुक्यात २६ जूनला सभा घेणार आहेत.


या सभेला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजप नेते आणि मोदी @९ अभियानाचे महाराष्ट्र संयोजक प्रवीण दरेकर, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार आणि भाजपाची इतर नेतेमंडळी हजर राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मोदी @९ अभियानांतर्गत देशभरात आयोजित केलेल्या ५१ सभांपैकी ही एक मोठी सभा असणार आहे.



सभेची तारीख पुढे ढकलली होती

बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या (Barsu Refinery)जागेला उद्धव ठाकरेंनी दिलेल्या भेटीनंतर नारायण राणेंची या ठिकाणी सभा होणार होती. मात्र, काही अपरिहार्य कारणांमुळे ही सभा पुढे ढकलण्याचा निर्णय भाजपकडून घेण्यात आला होता. आता या सभेची तारीख ठरली असून २६ जूनला या सभेत केंद्रीय मंत्री नारायण राणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांत केलेल्या विकासकामांचा आढावा घेतील. त्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण अशा या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.



आपलं बळ वाढवण्याची भाजपची रणनीती

राज्यात आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. ज्या भागांमध्ये आपली शक्ती कमी पडते आहे, ती वाढवण्याची भाजपची रणनीती आहे, त्याच दृष्टीने देशभरात सभांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत कोकणात केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

महाराष्ट्राची 'ब्लू इकॉनॉमी' देणार चीन-जपानला टक्कर; मंत्री नितेश राणे

मंत्री नितेश राणे; मच्छिमारांच्या हिताला बाधा न पोहोचवता कोकण किनारपट्टीचा जागतिक विकास करणार मुंबई (सुहास

नदीजोड प्रकल्पांची कामे कालमर्यादेत पूर्ण करा -ना.विखे पाटील

कोकण-गोदावरीसह चार महत्त्वाच्या योजनांचा घेतला आढावा मुंबई: राज्यातील महत्त्वाच्या नदीजोड प्रकल्पांची कामे

Nagpur-Madgaon Biweekly Train Regular : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस आता नियमित धावणार

कोकण : मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये तसेच भविष्यातही कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा

Sindhuratna Samruddhi Yojana 2.0 : 'सिंधुरत्न समृद्ध योजना २.०'ला मंजुरी

मंत्रिमंडळ बैठकीत तीन वर्षांच्या मुदतवाढीवर शिक्कामोर्तब; पालकमंत्र्यांकडे अध्यक्षपद, कोकणच्या सर्वांगीण

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Revenue Minister Chandrashekhar Bawankule : कोकणातील आंबा-काजू बागायतदारांना वाऱ्यावर सोडणार नाही!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू मुंबई : हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे