Air India: एअर इंडियाच्या पायलटचा अजब कारनामा, विमानाच्या कॉकपिटमध्ये मैत्रिणीला बसवलं

  147

चंदीगढ: एअर इंडियाच्या पायलटने विमानाच्या कॉकपिटमध्ये चक्क मैत्रिणीला बसवलं. याप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या पायलटवर कारवाई करत त्याचा परवाना एक वर्षासाठी रद्द केला आहे. या पायलटने अधिकारांचा गैरवापर आणि नियमांचं उल्लंघन करत प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली होती.


एअर इंडियाच्या चंदीगढ-लेह विमानामधील ३ जून रोजी ही घटना घडली. चंदीगड-लेह फ्लाइटच्या कॉकपिटमध्ये मैत्रिणीला बसल्याप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) गुरुवारी पायलटचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली. याशिवाय, याप्रकरणाबाबत माहिती न दिल्यामुळे विमानाच्या सह-वैमानिकावरही कारवाई करण्यात आली आहे. डीजीएसएने त्याच फ्लाइटच्या सह-वैमानिकाचा परवाना एका महिन्यासाठी रद्द केला आहे. ३ जून रोजी घडलेल्या घटनेनंतर दोन्ही वैमानिकांना चौकशी होईपर्यंत सेवेतून काढून टाकण्याचे आदेश याआधी जारी करण्यात आले होते.



डीजीसीएनं काय म्हटलं?


नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) सुरक्षा नियमांनुसार, अनधिकृत व्यक्तींना कॉकपिटमध्ये प्रवेश करण्याची परवानगी नाही आणि हे नियमांचं उल्लंघन आहे. "मेसर्स एअर इंडिया फ्लाइट AI-458 (चंदीगड-लेह) च्या पायलट-इन-कमांडने ३ जून रोजी एका अनधिकृत व्यक्तीला कॉकपिटमध्ये प्रवेश दिला आणि ती व्यक्ती संपूर्ण फ्लाइट दरम्यान कॉकपिटमध्येच उपस्थित होती."

Comments
Add Comment

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

Kolkata Rape Case : लॉ विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी, ममता सरकार निशाण्यावर

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार संचालित दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजशी संबंधित सामूहिक बलात्काराचा एक

MP News : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हामध्ये भरले २० लीटर डिझेल, मात्र निघालं १० लीटर पाणीच पाणी

डिझेल भरायला गेल्या अन् पाणी भरून आल्या... मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.