Threat call to Honey Singh : सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर हनी सिंगला जीवे मारण्याची धमकी

दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल


नवी दिल्ली : गायक-गीतकार सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose wala) याच्या हत्येची बातमी गेल्यावर्षी समोर आली होती. या हत्येचा मुख्य सूत्रधार गँगस्टर गोल्डी ब्रार (Gangster Goldy Brar) याने आता गायक यो यो हनी सिंगला (Yo Yo Honey Singh) जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे उघडकीस आले आहे. हनी सिंग याने कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी बराड असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीकडून खंडणीचे कॉल आल्याचे सांगितले होते. या प्रकरणी त्याने स्वतः दिल्ली पोलीस (Delhi Police) आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दाखल केल्याने बुधवारी २१ जूनला यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला.


मिळालेल्या माहितीनुसार, हनी सिंगला सध्या कॅनडामध्ये लपलेल्या गँगस्टरकडून व्हॉईस मेसेज (Voice Message) मिळाला. या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला. 'आजवर मला माझ्या चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळाले, मात्र अशी धमकी पहिल्यांदाच आल्याने मी व माझे कुटुंबीय प्रचंड घाबरलो आहोत', असे हनी सिंगने आयुक्तांची भेट घेतल्यानंतर सांगितले.


सिद्धू मूसेवाला याच्या हत्येनंतर काही दिवसांआधी सलमान खानला (Salman Khan) गोल्डीने धमकी दिली होती. सलीम खान (Salim Khan) यांना धमकीचे पत्र लिहित सलमानचे सिद्धू मूसेवालासारखे हाल करणार असल्याचं त्यामध्ये म्हटलं होतं. यानंतर आता हनी सिंगला व्हॉईस मेसेजद्वारे धमकी देण्यात आली आहे. गोल्डीचं खरं नाव सतविंदरजीत सिंह आहे. गोल्डी लॉरेंस बिश्नोईचा खास असून कॅनडामधून काम पाहतो.


हनी सिंग हा तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय असून त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. मध्यंतरी त्याने मोठा ब्रेक घेतला होता. यानंतर पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करत हनी सिंगने गायलेली काही गाणी रिलीज होऊन ती हिटही झाली. सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi ka bhai Kisi ki jaan) या चित्रपटासाठीदेखील हनीने गाणी गायली. अशातच आता हनी सिंगला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

मोदी सरकारचा मोठा निर्णय, पीएमओ आता ‘सेवा तीर्थ’, राजभवन होणार ‘लोक भवन’

नवी दिल्ली : केंद्र सरकार प्रशासकीय रचनेत मोठा बदल करण्याच्या तयारीत असून, सत्ता आणि अधिकार यांची पारंपरिक

भारतीय नौदलप्रमुखांच्या 'त्या' वक्तव्याने पाकिस्तानला भरली धडकी

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर आजही सुरू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव काही बाबी सार्वजनिक करता येत नाही. पण योग्य ती

Bomb Threat : 'बॉम्ब'च्या धमकीने इंडिगोच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई : हैदराबादहून कुवैतकडे जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एअरलाईन्सच्या एका विमानाला धमकीचा ई-मेल आल्यानंतर मंगळवारी

डिजिटल अरेस्ट घोटाळ्यांची चौकशी सीबीआयकडे द्या: सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाने सायबर गुन्ह्यांशी संबंधित 'डिजिटल अरेस्ट' प्रकरणांच्या

केरळच्या मुख्यमंत्र्यांना ईडीची नोटीस

तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था): तिरुवनंतपुरममध्ये केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्यावर नव्या आरोपांची

पाणीपुरी खाल्ली आणि वाचा गेली, महिलेचा जबडा सरकला

ओरैया : उत्तर प्रदेशमधील औरेया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. पाणीपुरी खाल्ल्यामुळे एका महिलेची वाचा गेली.