
मुंबई : आज ठिकठिकाणी योगा दिनाचे (Yoga Day) आयोजन करण्यात आले होते. गेट वे ऑफ इंडिया परिसरात भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथे महिलांनी पारंपरिक नऊवारी साडीत योगा दिन साजरा केला. या कार्यक्रमाला अनेक महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.