मुंबई : एका पोलिसापासून ते आदर्श पत्नीपर्यंतच्या प्रत्येक पात्रात अभिनेत्री सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) नेहमीच परफेक्ट दिसते. तिच्या प्रत्येक भूमिका ती लीलया पार पाडते. कामात व्यस्त असून ती फिट राहण्यासाठी देखील तितकेच कष्ट करते. तिच्या चाहत्यांना तिची ही एक गोष्ट कायम आवडते आणि म्हणून कामासोबत फिटनेसला महत्त्व देऊन ती कायम फिट राहण्याचा प्रयत्न करते.
ती (Sanya Malhotra) तिच्या सोशल मीडियावर नेहमी नवीन वर्कआउट रूटीन व्हिडिओ तिच्या फिटनेस मागची कारण सगळ्यांना दाखवत असताना फिट राहण्यासाठी ती खास डान्स देखील करताना दिसते. कामात व्यस्त असून सुद्धा काम आणि फिटनेस यांची योग्य सांगड घालून ती तिचा फिटनेस फंडा जपताना दिसते.
Sanya Malhotra चे काही खास फिटनेस व्हिडिओ इकडे पाहा !
कथल मधल्या तिच्या चमकदार अभिनयाने ती पुन्हा चर्चेत आली.
अभिनेत्रीने तिच्या प्रयत्नांनी बोलीभाषेवर आणि पोलिसाच्या व्यक्तिरेखेवर प्रभुत्व मिळवले. ती लवकरच जवान, सॅम बहादूर आणि सौ. या चित्रपटात झळकणार आहे.