मुंबई : मुंबई महानगरापालिकेतील (BMC) ठेवी संदर्भात सरकारला जाब विचारण्यासाठी ठाकरे गटाकडून १ जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणाऱ्या मोर्चावर शिवसेनेच्या प्रवक्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी उबाठाचा १ जुलैचा मोर्चा हा भीती मोर्चा आहे, असा टोला लगावला आहे.
पत्रकार परिषदेत बोलतांना मनिषा कायंदे म्हणाल्या, मुंबई महापालिकेच्या कामकाजातील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीमुळे उबाठा गटाचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे त्याच्याविरोधात महापालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारासंदर्भात हा मोर्चा असल्याचे सांगितले जात आहे. खरे तर हा भीती मोर्चा आहे. कॅगच्या अहवालवरून लक्ष हटवण्यासाठी हा मोर्चा काढला जात आहे. जर तुम्ही काही केले नसेल तर चौकशीला निडरपणे सामोरे जाण्याची गरज आहे. चौकशी लावल्यावर पोटात भीतीचा गोळा का आला? भ्रष्ट्राचाराचा मुद्दा असेल तर मागील इतिहास देखील तपासावा लागेल, असा इशाराही कायंदे यांनी दिला.
त्या म्हणाल्या, महापालिकेच्या कामाची चौकशी लावली तर महापालिकेवर मोर्चा का काढावा लागतो याचा विचार करण्याची गरज आहे. कॅगचा अहवाल आल्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करु नये, अशी तुमची इच्छा आहे का? असा खोचक सवाल करत मुंबईकरांची दिशाभूल करु नका, असे त्या म्हणाल्या.
त्या म्हणाल्या, मुंबई महापालिकेच्या एफडी मोडल्याचा कांगावा उबाठा गटाकडून जाणिवपूर्वक केला जात आहे. जनतेला याच मुद्द्यात गुंतवून ठेवले जात आहे. एफडी वापरल्या तरी त्यामध्ये वाढ करुन ७७ हजार कोटी वरुन ८८ कोटी वर आणल्या. आम्ही हा निधी घाण पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी वापरला. यापूर्वी शहरातील घाण पाणी तसेच समुद्रात थेट सोडले जात होते. स्वतःला पर्यावरणवादी समजणारे व किनारपट्टी स्वच्छ करण्याचा केवळ फोटोजेनिक इव्हेंट करण्यात मर्दुमकी समजणाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले, असा टोला नाव न घेता त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…