Amey Ghole : टक्केवारी खाणार्‍या ह्या कारकूनाची कसून चौकशी करा

सूरज चव्हाणवरील ईडीच्या छापेमारीनंतर अमेय घोले यांचे ट्वीट


मुंबई : आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांच्यावरील ईडीच्या छापेमारीनंतर काही दिवसांपूर्वीच नाराज होऊन ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या अमेय घोले (Amey Ghole) यांनी खरमरीत ट्वीट केले आहे. अमेय घोले यांनी ट्वीट करत टक्केवारी खाणार्‍या ह्या कारकूनाची कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे.


ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "ज्या कारकुनाच्या घरी छापा पडला, त्याला बरोबर ठराविक बैठकीआधी, Acres Club चेंबूर येथे किती कंत्राटदार भेटायला येत होते आणि ह्याचे त्यांच्याशी नेमके काय संबंध आहेत, ह्याची सुद्धा चौकशी व्हावी."





तसेच, पुढे ट्वीटमध्ये अमेय घोलेंनी म्हटले आहे की, "शिवसैनिकांना मिळालेल्या कामाची टक्केवारी खाणार्‍या ह्या कारकूनावर, जर शिवसेनेसाठी जीव झोकून देणारे निम्म्याहून अधिक विभागप्रमुख, आमदार, नगरसेवक व शिवसैनिक नाराज आहेत, तर ह्यामागची कारणं ही तितकीच गंभीर असावीत."


मुंबई महानगरपालिकेसह विधान सभा, राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये पदड्यामागची सूत्र हलवणारे शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय असून विविध निवडणुकांमध्ये पदड्यामागची गणितं सूरज चव्हाण यांच्या हाती असतात. यामुळे अनेकजण नाराज आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक

Chandrashekhar Bawankule : राज्यात 60 ‘आदर्श दुय्यम निबंधक’ कार्यालये उभारणार; पुण्यातील कोथरूडमध्ये पहिले कार्यालय

मुंबई : राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांचे आधुनिकीकरण करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नोंदणी

Jalgaon Crime : कंटाळा आला आहे, आता मी निघतो...; सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या

Jalgaon Crime : राजस्थानमध्ये पाठविलेल्या मालाचे ७ लाख रुपये मिळत नसल्याने एका तरुण उद्योजकाने आपली जीवनयात्रा संपवली