मुंबई : आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांच्यावरील ईडीच्या छापेमारीनंतर काही दिवसांपूर्वीच नाराज होऊन ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या अमेय घोले (Amey Ghole) यांनी खरमरीत ट्वीट केले आहे. अमेय घोले यांनी ट्वीट करत टक्केवारी खाणार्या ह्या कारकूनाची कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “ज्या कारकुनाच्या घरी छापा पडला, त्याला बरोबर ठराविक बैठकीआधी, Acres Club चेंबूर येथे किती कंत्राटदार भेटायला येत होते आणि ह्याचे त्यांच्याशी नेमके काय संबंध आहेत, ह्याची सुद्धा चौकशी व्हावी.”
तसेच, पुढे ट्वीटमध्ये अमेय घोलेंनी म्हटले आहे की, “शिवसैनिकांना मिळालेल्या कामाची टक्केवारी खाणार्या ह्या कारकूनावर, जर शिवसेनेसाठी जीव झोकून देणारे निम्म्याहून अधिक विभागप्रमुख, आमदार, नगरसेवक व शिवसैनिक नाराज आहेत, तर ह्यामागची कारणं ही तितकीच गंभीर असावीत.”
मुंबई महानगरपालिकेसह विधान सभा, राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये पदड्यामागची सूत्र हलवणारे शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय असून विविध निवडणुकांमध्ये पदड्यामागची गणितं सूरज चव्हाण यांच्या हाती असतात. यामुळे अनेकजण नाराज आहेत.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…