Ban on Khoke Din : ठाकरे गटाच्या खोके दिनाला पोलिसांचा प्रतिबंध

  149

शाखाप्रमुखांसह माजी नगरसेवकांना पाठवल्या नोटिसा


मुंबई : महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड करुन नवी शिवसेना (Shivsena) स्थापन केली त्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना 'स्वाभिमान दिन' (Swabhiman din) साजरा करणार आहे, तर ठाकरे गटाने हा दिवस 'जागतिक खोके दिन' म्हणून साजरा करायचे ठरवले आहे. मात्र राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेला हानी पोहोचू नये याकरता मुंबई पोलिसांनी ठाकरे गटाच्या खोके दिनाला प्रतिबंध केला आहे. तशा नोटिसाच ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांसह माजी नगरसेवकांना व पदाधिका-यांना पाठवण्यात आल्या आहेत.


विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाच्या रात्रीच म्हणजेच २० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची साथ सोडत बंड केलं, त्यामुळे शिवसेनेत फूट पडली तरी खरा शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली तयार झाला. त्यानिमित्त शिवसेना आजचा दिवस स्वाभिमान दिन म्हणून साजरा करणार आहे आणि ठाकरे गट हा दिवस जागतिक खोके दिन म्हणून पाळणार आहे. ठाकरे गटाच्या रविवारी झालेल्या मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी तसे आदेश दिले होते. मात्र अशाप्रकारे कुठलाही दिन साजरा करण्यास ठाकरे गटाला मुंबई पोलिसांकडून प्रतिबंध करण्यात आला आहे. असा दिन साजरा केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी सूचना या नोटीसमध्ये देण्यात आली आहे.


दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस २० जून गद्दार दिन म्हणून साजरा करणार आहे. यासंबंधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून प्रत्येक तालुका स्तरावर गद्दार दिन साजरा करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे ठाकरे गटाच्या तसंच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर तशाप्रकारच्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत. मात्र, यालाही पोलिसांनी प्रतिबंध केला. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन व्हावे याकरता पोलिसांनी कडक बंदोबस्त केला आहे.



ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, दक्षिण मुंबईमध्ये खोके दिन साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे कार्यकर्ते काहीसे आक्रमक झाल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे बजावले आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Tata Hospital : भारतात टाटा रुग्णालयामध्ये प्रथमच एमआयबीजी पद्धतीचा वापर, न्यूरोब्लास्टोमा रुग्णाचा जीव वाचला...

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून न्यूरोब्लास्टोमा (Neuroblastoma) कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होतं आहे. यापूर्वी अनेक

झिशान सिद्दीकी यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन सोडले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते झिशान सिद्दीकी यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून

MHADA Lottery : आता सर्वसामान्यांना घर खरेदी करता येणार, म्हाडाच्या ६२४८ घरांच्या किमतीत कपात...

मुंबई : MHADA house prices reduced सर्वसामान्यांना हक्काचं घर खरेदी करण्यासाठी म्हाडाकडून अल्पदरात (MHADA Price)  घरांची सोडत काढण्यात

कोकण किनारपट्टीला ३.५ ते ४.५ मीटर उंच लाटांचा इशारा

मुंबई : रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर

BMC : प्रतिष्ठित इमारतींना सौंदर्य बहाल करणार, इमारतीचा ५० टक्के भाग खुला, मनपाचे नवीन धोरण

मुंबई :  महानगरपालिका शहराच्या विकासासाठी नवीन धोरण तयार करण्याच्या उद्देशाने पाऊल उचलणार असून शहरातील

व्यायाम केल्यानंतर ही चूक कधीही करू नका ...

मुंबई : फिटनेस जपण्यासाठी चालणे, धावणे, जिम करणे या पद्धतीने घाम गाळण्यावर हल्ली अनेकांचा भर असतो. व्यायाम केला की