Nitesh Rane On Uddhav Thackeray : सगळ्या अवलींचा टोळीप्रमुख उद्धव ठाकरे; याचा जन्मदिवस ‘देशद्रोही दिन’ म्हणून साजरा करावा

Share

भाजप आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या बेईमानीचा वाचला पाढा

मुंबई : षण्मुखानंद येथे झालेल्या उबाठा सेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजप-शिवसेना युतीला दोष देत अनेक चुकीचे आरोप केले. याला सडेतोड प्रत्युत्तर देताना भाजप आमदार नितेश राणे यांनी आपली भूमिका मांडली. यात नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या बेईमानीचा पाढाच वाचला. त्यांच्या गद्दारी आणि देशद्रोहीपणामुळे त्यांचा जन्मदिवस ‘देशद्रोही दिन’ म्हणून साजरा केला जावा, अशी मोठी मागणी नितेश राणेंनी ट्विटद्वारे युनोकडे केली आहे.

मुख्यमंत्री बनण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे उद्धव ठाकरेंनी स्वतःचे वडील, स्वतःचं कुटुंब आणि मराठी माणूस व हिंदू धर्माशी बेईमानी केली. यांच्यासारखा गद्दार आणि देशद्रोही परत जन्माला येणं शक्य नाही. ज्या देवेंद्र फडणवीसांनी २०१४-१९ या काळात उद्धव ठाकरेंना सख्ख्या भावासारखं सांभाळलं त्यांच्याशीही उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली. त्यामुळे हा दिवस ‘देशद्रोही दिन’ म्हणून साजरा करावा, अशी खळबळजनक मागणी नितेश राणेंनी केली.

संजय राऊतांची भाषा ही खरं तर उद्धव ठाकरेंची भाषा

संजय राऊतांची भाषा, त्यांचं थुंकणं येतं कुठून? सुषमा अंधारेंचं हिंदू देवदेवता आणि महापुरुषांचा अपमान करणं, लोकांच्या घरांवर मोर्चे काढणं, काड्या लावणं, अवलीगिरी करणं हे कुठून येतं, हे कालच्या उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन समजतं. जी भाषा संजय राऊतांच्या तोंडी येते ती खरं तर उद्धव ठाकरेंची आहे. उद्धव ठाकरे हा घाणेरड्या वृत्त्तीचा माणूस आहे, हे यांतून दिसतं. यात संजय राऊत किंवा सुषमा अंधारेंना दोष देऊन उपयोग नाही, कारण खरी घाण आणि कीड म्हणजे उद्धव ठाकरे आहे, अशी सनसनाटी टीका नितेश राणेंनी केली.

महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा ‘अवली’ उद्धव ठाकरे

खरं तर चांगले विचार देण्यासाठी वर्धापन दिन साजरा केला जातो. मात्र उद्धव ठाकरे काल अवलीकवली, केसांच्या कुठल्या कुठल्या भागांचा उल्लेख करत होते. हे कोणते पक्षप्रमुख? उलट महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा ‘अवली’ उद्धव ठाकरे आणि त्याचा मुलगा आदित्य ठाकरे ‘कवली’ आहे, असं नितेश राणे म्हणाले.

सगळी लूटालूट बाहेर पडणार

षण्मुखानंदला केलेल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी जो थयथयाट केला, ती चिड, तो राग देशासाठी, राज्यासाठी, सैनिकांसाठी, मणिपूरमध्ये काय घडतंय यासाठी नव्हता तर हा थयथयाट कॅटच्या अहवालानुसार जी एसआयटी (SIT) स्थापन झाली आणि त्यात जी कारवाई होणार आहे त्यासाठी होता. कारण त्यांची सगळी लूटालूट यामुळे बाहेर पडणार आहे. ३३ देशांत ठाकरेंचे पैसे नंदकिशोर चतुर्वेदीने लपवले आहेत, तर सरकारी भाचा सरदेसाई मुख्यमंत्री शिंदेंच्या पाठी माझा पक्षात प्रवेश करुन घ्या यासाठी फिरतोय. त्याने कोणाला फोन केले, काय काय बोलला या सगळ्याचीच माहिती आमच्याकडे आहे आणि आम्ही ती देणार आहोत. मुंबई पालिकेतील मस्ती बाहेर, येणार संज्या चा मालक जेल मध्ये जाणार, असं नितेश राणे यावेळी म्हणाले.

पेंग्विनने मुंबईच्या लूटमारीचं प्रेझेंटेशन बघावं

पेंग्विनने मेळाव्यात मुंबईच्या विकासकामांचं प्रेझेंटेशन (Presentation) दाखवून आणखी खोटारडेपणा केला. खरं तर २५-३०वर्षे त्याच्या कुटुंबाने मुंबईला अक्षरशः दरोडेखोरांसारखं लुटलं. स्वतःच्या प्रत्येक खर्चासाठी मुंबईकरांचे पैसे वापरले. मी पेंग्विनला आवाहन करतो की, मी वरळीचं नेस्को ग्राऊंड बुक करतो, तिथे येऊन मुंबईच्या लूटमारीचं प्रेझेंटेशन अमित साटम करुन दाखवतील ते तू बघावं.

आधी बाप कळला का?

भाषणात उद्धव ठाकरे सतत माझा बाप चोरला, असं म्हणत होते. पण त्यांना आधी बाळेसाहेबांचे विचार कळले आहेत का? त्यांचा बाप त्यांना समजला आहे का? बाळासाहेब कळले असते तर २ वर्धापनदिन झाले नसते, अशा शब्दांत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना खडसावलं.

हिंदू खतरे में तुमच्यामुळेच

भाषणात भाजपाला दोष देत हिंदू खतरे में है असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्याला जोरदार प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले, अडीच वर्षे महाविकास आघाडीच्या काळात धर्मांतर लव्ह जिहाद (Love Jihad), लँड जिहाद (Land Jihad) माध्यमातून तुमच्यामुळेच हिंदू खतरे में आहे. मुंबईत बांगलादेशी, रोहिंगे वाढले. बेहराम पाडा, भारतनगर, मालवणी भागात त्यांना वीज आणि पाणी ठाकरेंच्या सत्ता काळात मुंबई महानगरपालिकेने पुरवले. संजय राऊत तुझ्या मालकाने हिंदूंशी गद्दारी केली, म्हणून आम्हाला हिंदू जन आक्रोश मोर्चा काढावा लागतो.

सगळ्या अवलींचा टोळीप्रमुख उद्धव ठाकरे

पक्षात राहून उद्धव ठाकरेंना कोण संपवत असेल तर तो संजय राऊत आहे. हे उद्धव ठाकरेंना कधी कळणारच नाही कारण त्यांना अशी अवली माणसंच लागतात. अनिल परब, अनिल देसाई, सुभाष देसाई या सगळ्या अवलींचा टोळीप्रमुख म्हणजे उद्धव ठाकरे, असा आरोप नितेश राणेंनी केला.

बालबुद्धीच्या उद्धव ठाकरेंना कळणार नाही

विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता पण येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचा होईल. देवेंद्रजीनी मनाचा मोठेपणा दाखवून २०१७ ला मुंबईत सेनेचा महापौर बसवला. मोदी साहेबांच्या नेतृत्वात भारताने वैक्सींन तयार करून जगाला दिली, हे बालबुद्धीच्या उद्धव ठाकरेंना कळणार नाही, असं म्हणत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

काश्मीर खोऱ्यात लपले आहेत ५६ विदेशी अतिरेकी, सूत्रांची माहिती

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत लष्कर - ए - तोयबा…

16 seconds ago

OTT: या आठवड्यात फक्त ओटीटीवर अ‍ॅक्शन दिसणार, हे १२ चित्रपट प्रदर्शित होतील..

नवी दिल्ली: या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर फक्त अ‍ॅक्शन बघायला मिळणार आहे. अनेक नवीन चित्रपट आणि…

5 minutes ago

बारामुलात दोन अतिरेकी ठार, पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर सुरक्षा पथकांची पहिली कारवाई

बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…

1 hour ago

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सेलिब्रिटींचा संताप..

मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…

2 hours ago

SRH vs MI, IPL 2025: मुंबई इंडियन्स विजयाचा चौकार मारेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…

4 hours ago

दक्षिण मुंबईतील १४ हजार इमारतींचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…

4 hours ago