शिवसेनेतून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी काय कारनामे केले? नारायण राणे यांनी स्पष्टच सांगितलं

'खुपते तिथे गुप्ते' कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मोठे गौप्यस्फोट


मुंबई: झी मराठी वाहिनीवरील बहुचर्चित 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सिझनमध्ये केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांची राजकीय मुलाखत विशेष रंगली. यावेळी नारायण राणेंनी अनेक गौप्यस्फोट केले. मला शिवसेनेतून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कुटुंबासह दोनदा घर सोडलं, असा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केला.


नारायण राणे याआधीच्या सिझनमध्येही पत्नीसह सहभागी झाले होते. त्यावेळीही राणे यांनी गुप्तेंचा मंच गाजवला होता. यावेळी पहिला गौप्यस्फोट करताना ते म्हणाले, ' सध्या उबाठा गटाची जी परिस्थिती आहे ती त्यांनीच निर्माण केली आहे. आम्ही सगळे जायला तेच कारणीभूत आहेत. मी शिवसेनेत असतो तर त्यांची वाईट अवस्थाही झाली नसती. एक आमदार इकडचा तिकडे जाऊ शकत नव्हता. ४० तर सोडाच' असं वक्यव्य नारायण राणे यांनी केलं.



बाळासाहेबांसाठी मी, 'माझा शिवसैनिक'


'बाळासाहेबांना जे वाटायचं राज्य कारभाराबद्दल ते मला चांगलं माहिती होतं. त्यामुळे त्यांना खात्री होती, की याला सांगायची गरज नाही, हा करणार. त्यांना एखादं पुस्तक मला द्यायचं असेल, तर ते लिहायचे, माझा शिवसैनिक नारायण राणे. नुसतं नारायण राणे म्हणून कधी पत्र लिहिलं नाही, माझा शिवसैनिक असायचंच' अशी आठवणही राणेंनी सांगितली.



उद्धव ठाकरेंची ती धमकी


'मला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दोनदा घर सोडलं. हॉलिडे इनमध्ये कुटुंबासह राहायला गेले होते. मात्र दोन्ही वेळा बाळासाहेबांना तयार करुन मी जाऊन आणलं, ते साहेबांना एकच धमकी द्यायचे, घर सोडायची' असा खळबळजनक गौप्यस्फोट नारायण राणेंनी केला.



राऊतांना खासदार मी केला...


संजय राऊत यांना खासदार मी केला, तेव्हा खासदार झाले नसते, तर पुढे कधीच झाले नसते, हे माझं पाप आहे, अशी संजय राऊत यांच्याबद्दल खंतही यावेळी नारायण राणे यांनी बोलून दाखवली.


Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)