Ajit Pawar Vs Sanjay Raut : अजित पवारांनी झापल्यानंतर संजय राऊतांची सारवासारव

ठाकरे गटाच्या मेळाव्यात केले होते विधान


मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) काहीतरी वक्तव्य करायचं आणि मग त्यावर आवाज उठवला गेला की अजबगजब विधाने करत सारवासारव करायची हे जणू समीकरणच झाले आहे. काल ठाकरे गटाच्या मेळाव्यात 'आम्ही महाविकास आघाडीमध्ये जोपर्यंत उद्धवजींची इच्छा आहे तोपर्यंत राहू. ते काही आमच्या हातात नाही. हे राजकारण आहे', असे स्पष्टच म्हटले होते. मात्र, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या (Ajit Pawar) प्रतिक्रियेनंतर आपल्या विधानात त्यांनी सोयीस्कररित्या बदल केला आहे.


अजित पवार म्हणाले, 'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना संजय राऊत म्हणायचे, आमची आघाडी २५ वर्षे टिकणार आहे. तेव्हा २५ वर्षे टिकेल असं वाटत होतं. आता पुढे एकट्याचं सरकार यावं असं वाटत असेल. यात चुकीचं काय? प्रत्येकाला आपला-आपला पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे', असं म्हणत पवारांनी राऊतांना शुभेच्छा दिल्या.


तसेच आता संजय राऊतांना उपरती झाल्याने त्यांनी यावर सारवासारव करणारे स्पष्टीकरण दिले. त्यावरुन आता महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाला राहण्याची इच्छा आहे की नाही, याबाबत संजय राऊत स्वतःच संभ्रमात असावेत, असे चित्र दिसत आहे.


दरम्यान, अजित पवारांनी मविआबद्दल मी थेट उद्धव ठाकरेंनाच विचारेन, असं म्हटल्यामुळे संजय राऊतांच्या स्पष्टीकरणाला अजित पवारांच्या लेखी काही किंमत नसावी, असं दिसून येत आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Comments
Add Comment

Tripartite agreement : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

मुंबई : वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

Bhandup Incident : दहाव्या मजल्यावरून पडली अन् झाडात अडकली; भांडुपच्या घटनेचा VIDEO पाहून धक्का

मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. भांडुपमधील सनशाईन SRA इमारतीच्या

'BEST' electricity : गणेशोत्सव मंडळांसाठी 'BEST'चे नवे वीज नियम; तात्पुरत्या कनेक्शनसाठी अर्जापासून शुल्कापर्यंत सर्व माहिती

मुंबई : गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा

Devendra Fadnavis : गर्भवती मातांसाठी मोठी दिलासादायक बातमी; तीव्र रक्तक्षयावर उपचारांना मिळणार वेग

तीव्र रक्तक्षयग्रस्त गरोदर मातांच्या उपचारांना गती मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Major decision by MHADA : उमरखाडीतील १,९२८ रहिवाशांना मिळणार ५०० चौरस फुटांची हक्काची घरे!

मुंबई : भायखळा येथील ऐतिहासिक आणि दाट वस्तीच्या उमरखाडी परिसराचा समूह पुनर्विकास करण्याचा अत्यंत महत्त्वाचा

Azad Maidan Protest : आझाद मैदान वगळता मुंबईत सर्व ठिकाणी आंदोलनास बंदी

- गृह विभागाचे तातडीचे आदेश; मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी मुंबई : मराठा आंदोलक