Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीआठशेहुनही अधिक चित्रपटांत काम केलेल्या ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन, चाहत्यांवर शोककळा!

आठशेहुनही अधिक चित्रपटांत काम केलेल्या ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन, चाहत्यांवर शोककळा!

इदुक्की: मल्याळम सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि ज्येष्ठ अभिनेते पूजापुरा रवी (Poojappura Ravi) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने मल्याळम सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या चाहत्यांनाही त्यांच्या निधनाच्या बातमीने मोठा धक्का बसला आहे.

पूजापुरा रवी यांनी ८०० पेक्षा अधिक सिनेमांत काम केलं आहे. ‘गप्पी’ या सिनेमात ते शेवटचे झळकले आहेत. या सिनेमात त्यांनी मल्याळम अभिनेते टोविनो थॉमस यांच्यासोबत काम केलं होतं. दिवंगत एन.के. आचार्य यांच्या नाटकाच्या माध्यमातून पूजापुरा रवी यांनी त्यांच्या करियरची सुरुवात केली. मल्याळम रंगभूमीवरील ते लोकप्रिय अभिनेते होते. आजवर त्यांनी अनेक लोकप्रिय सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -