Manisha Kayande: अखेर मनिषा कायंदे यांचा शिवसेनेत प्रवेश! म्हणाल्या...कचऱ्यातून....

  207

ठाणे: उद्धव ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी अखेर रविवारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत त्यांनी ठाण्यातील आनंदाश्रम येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर त्यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला. मागील एक वर्ष प्रतीक्षा केली. मात्र, उद्धव ठाकरे यांनी काय केलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. उबाठा शिबिरात आलेले अनेकजण शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावाही कायंदे यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनिषा कायंदे यांची सचिवपदी नियुक्ती केली. तसेच यावेळी बाळासाहेबांचे शिवसेना इथे आहे म्हणून मी इथे आहे. कोणी तरी सांगितलं कचरा निघून जात आहे. कचऱ्यातून उर्जानिर्मिती होते, असं म्हणत कायंदे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला.


शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनिषा कायंदे यांनी म्हटले की, माझ्यासाठी आज खूप सन्मानाचा दिवस आहे. जी मूळ शिवसेना आहे त्यामध्ये आज मी पक्ष प्रवेश करत असल्याचे त्यांनी म्हटले. मी पक्षाची भूमिका भक्कमपणे मांडली. हा बदल आत्ताच का झाला? तर हे सरकार एक वर्ष पूर्ण करत आहे. एका वर्षामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामातून त्यांना उत्तर दिलं असल्याची कायंदे यांनी म्हटले.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. मै भी कुछ नही करूंगा ,,,किसी को कुछ नहीं करने दूंगा असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. कोविड काळामध्ये जनतेला कोण भेटत होतं, हे जनतेला माहीत आहे. नुसतं फेसबुक लाईव्ह आणि ऑनलाइनच्या माध्यमातून माणसं वाचत नसतात. अडीच वर्षामध्ये त्या सरकारने काय काम केलं आणि अकरा महिन्याचे सरकार काय काम करत आहे हे सर्वांना माहिती आहे. देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये सर्व काम अडीच वर्षामध्ये बंद केली अशी टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. त्यांच्याकडे एकच कॅसेट वाजत असते. आता त्यांना स्क्रिप रायटर बदलला पाहिजे असा टोलाही त्यांनी लगावला. वर्धापन दिनाच्या दिनी कार्यक्रमात अधिक बोलणार असल्याचे सूचक वक्तव्यही मुख्यमंत्री शिेदे यांनी केले.

Comments
Add Comment

मुरबाड तालुक्यातील ११ जिल्हा परिषद शाळा शिक्षकांविना

सामाजिक कार्यकर्ते दिनेश जाधव यांचा आंदोलनाचा इशारा! मुरबाड : मुरबाड तालुक्यातील ११ जिल्हा परिषद शाळेतील

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महायुतीचा झेंडा

१८ जागांपैकी १५ जागांवर महायुती विजयी, २ महाविकास आघाडी, तर १ अपक्ष डोंबिवली : कल्याण कृषी उत्पन्न बाजार

पर्यावरणपूरक-ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणेल

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन ठाणे  : पर्यावरण पूरक व पैशाची बचत करणारा इ-ट्रॅक्टर कृषी क्षेत्रात

सहा वर्षीय मुलीच्या चिकटलेल्या बोटांवर यशस्वी सर्जरी

ठाणे : जन्मजात हातापायाची बोटे चिकटलेली असल्यास भविष्यात त्याचा त्रास होण्याचा संभव असतो. वेळेत शस्त्रक्रिया

बदलापूरची जांभळे लंडनच्या बाजारपेठेत दाखल

बदलापूर : देशातील पहिले भौगोलिक मानांकन मिळालेली बदलापुरातील जांभळे आता देशाची सीमा ओलांडून लंडनच्या

वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या रिक्षाचालकांवर गुन्हे

डोंबिवली  : शहरातील पश्चिम रेल्वेस्थानक भागात वर्दळीच्या रस्त्यावर रिक्षा उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण