Tuesday, May 13, 2025

देशताज्या घडामोडी

भगवद्‌गीतेच्या १६२ दशलक्षहुन अधिक प्रती छापणाऱ्या प्रेसला देशातील ‘हा’ सर्वोच्च शांतता सन्मान

भगवद्‌गीतेच्या १६२ दशलक्षहुन अधिक प्रती छापणाऱ्या प्रेसला देशातील ‘हा’ सर्वोच्च शांतता सन्मान

गोरखपूर: गोरखपूरच्या गीता प्रेसला(Gita Press Gorakhpur) २०२१ गांधी शांतता पुरस्कार प्राप्त झाला आहे. शांतता आणि सामाजिक सौहार्दाच्या गांधीवादी आदर्शांचा पुरस्कार केल्याबद्दल पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील परीक्षक मंडळाने हा पुरस्कार जाहीर केला. गीता प्रेस १००  वर्षे जुनी आहे. पुरस्कार  मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अभिनंदन केले.


२०२१ सालचा गांधी शांतता पुरस्कार गोरखपूर प्रेसला देण्यत आला आहे. गीता प्रेसने गेल्या १०० वर्षांत लोकांमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक बदल घडवून आणण्यासाठी प्रशंसनीय कार्य केले आहे. गीता प्रेस, गोरखपूरला २०२१चा गांधी शांतता पुरस्कार मिळाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.





जगातील सर्वात मोठ्या प्रकाशकांपैकी एक


गीता प्रेस १९२३ मध्ये सुरू करण्यात आली. ही प्रेस जगातील सर्वात मोठ्या प्रकाशकांपैकी एक आहे. गीता प्रेसने १४ भाषांमध्ये ४१७ दशलक्ष पुस्तके प्रकाशित केली आहे. गीता प्रेसने श्रीमद् भगवद्‌गीतेच्या १६२.१ दशलक्ष प्रती प्रकाशित केल्या आहेत. गांधी शांतता पुरस्कार हा १९९५ मध्ये महात्मा गांधींच्या १२५ व्या जयंतीनिमित्त गांधींनी मांडलेल्या आदर्शांचा सन्मान करण्यासाठी देण्यात येतो.



पुरस्काराचे स्वरुप 


मंत्रालयाने म्हटले आहे की हा पुरस्कार कोणत्याही व्यक्तीला त्याचे राष्ट्रीयत्व, वंश, भाषा, जात, पंथ किंवा लिंग विचारात न घेता दिला जातो.  एक कोटी रुपये, सन्मानपत्र, प्रशस्तीपत्रक आणि उत्कृष्ट पारंपारिक हस्तकला/हातमाग वस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आतापर्यंत हा पुरस्कार सुलतान काबूस बिन सैद अल सैद, ओमान (२०१९) आणि बंगबंधू शेख मुजीबुर रहमान, बांगलादेश (२०२०) यांना देण्यात आला आहे.

Comments
Add Comment