my bmc : मुंबईतील सिमेंट काँक्रीट रस्त्यांवर ३ वर्षात खड्डे पडल्यास ठेकेदार जबाबदार

मुंबई : मुंबई खड्डे मुक्त व्हावी यासाठी सिमेंट काँक्रीटचे ४०० किलोमीटरचे रस्ते करण्याचे कामे हाती घेण्यात आले आहे. शहरातील एकूण ९१२ रस्ते सिमेंट क्रॉंक्रीटचे होणार असून सध्या ८६ रस्त्यांची कामे सुरु आहेत तर ३९ सिमेंट क्रॉंक्रीटचे रस्ते बांधून पूर्ण झाले आहेत. तर उर्वरित सिमेंट क्रॉंक्रीटच्या रस्त्यांची कामे पावसाळ्यानंतर सुरु होतील, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी दिली. तसेच सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्यांवर ३ वर्षांत खड्डे पडल्यास त्याला ठेकेदार जबाबदार असेल, असा इशारा सुद्धा पी वेलरासू यांनी दिला आहे.


मुंबईतील ४०० किलोमीटरचे रस्ते सिमेंट क्रॉंक्रीटचे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल यांना दिले होते. चहल यांनी पुढील दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त होतील आणि संपूर्ण रस्ते सिमेंट काँक्रिटचे असतील, अशी ग्वाही दिली आहे. मुंबईत सिमेंट काँक्रिटचे रस्ते करण्यासाठी पाच ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.


एकूण ९१२ रस्त्यांची कामे होणार असून आतापर्यंत ३९ कामे पूर्ण झाली आहेत. मात्र पावसाळ्यात सिमेंट क्रॉंक्रीटचे रस्त्याचे काम करणे शक्य नसल्याने ऑक्टोबरपासून पुन्हा सिमेंट क्रॉंक्रीटचे रस्ते करण्यास सुरुवात होईल, असेही वेलरासू यांनी सांगितले. सिमेंट क्रॉंक्रीटचे रस्ते काम पूर्ण झाल्यानंतर त्या रस्त्यांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असणार आहे, असेही ते म्हणाले. १० वर्षे हमी कालावधीत रस्त्यांच्या देखभालीची जबाबदारी ठेकेदारांची असेल.

Comments
Add Comment

Minister Adv. Ashish Shelar : पुन्हा अतिक्रमणे वाढून देऊ नका; मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेत आज उपनगर जिल्ह्यातील शासकीय

Cyber Police : बदलत्या काळातील गुन्ह्यांचे आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज होत काम करण्याची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

३६ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२६ चा समारोप मुंबई  : महाराष्ट्र पोलीस दलाने बदलत्या काळातील

Legislature's security system : विधिमंडळाच्या सुरक्षा यंत्रणेत होणार मोठे बदल

सभापती राम शिंदेंनी दिले निर्देश; संसदीय आयुधांचा गैरवापर टाळण्यासाठी विशेष उपाययोजना मुंबई : विधिमंडळ

Shree Kshetra Chondi Development Plan : चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा उभाराव्यात • श्री क्षेत्र चोंडी विकास आराखडा आढावा बैठक मुंबई  : पुण्यश्लोक

Central Railway News : मध्य रेल्वे मार्गावर कोणताही व्यत्यय न आणता मेट्रो लाईन 2ब वरील महत्त्वपूर्ण स्टील स्पॅन उभारणी पूर्ण

कुर्ला ते टिळक नगर रेल्वे ट्रॅक दरम्यान 41.5 मीटर लांबीचा, 178 टन वजनाचा स्ट्रक्चर मुंबई :  मुंबई महानगर प्रदेश विकास

Thane Zilla Parishad : ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलं आता अवकाशाच्या दिशेने; ‘मिशन भरारी’ उपक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला हिरवा झेंडा

59 ग्रामीण विद्यार्थ्यांची 'इस्रो' सफर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘ग्रामीण ते अवकाश’ व्हिजन ठाणे जिल्हा