मुंबई: काल ठाण्यामध्ये उबाठाच्या अयोध्या पौळ यांच्यावर झालेली शाईफेक ही महापुरुषांचा अपमान झाल्यामुळे झालेली आहे. संजय राऊत यांच्यासारख्या शक्तीकपूरने महिलांवरील अत्याच्याराविरोधात गमजा मारुच नयेत. त्यांच आणि एका डॉक्टर महिलेमधील संभाषण सगळ्या महाराष्ट्राने ऐकलं आहे. त्या संभाषाणात संजय राऊत यांनी त्या महिलेला काय शिविगाळ केली हे सगळ्यांनी पाहिलंय. ती महिला संजय राऊत यांच्या मालकाकडे म्हणजेच उद्धव ठाकरेंकडेही तक्रार घेऊन गेली होती पण संजय राऊत यांनी ते प्रकरण दाबून टाकलं असा सनसनाटी घणाघात भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे.
हेही वाचा….
आज त्यांनी संजय राऊत यांचे पुन्हा एकदा वाभाडे काढत त्यांच्यावर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले, संजय राऊत मणिपूर हिसांचारावरुन देशाचे गृहमंत्री यांना अक्कल शिकवत आहेत त्यापेक्षा त्यांनी कर्नाटकात हिंदूंवरील अत्याचारावर बोलावे. भारताच्या इतिसाहामध्ये मो अमित शहासारखा सर्वात जास्त ताकदीचा मंत्री देशाला लाभला आहे. बाळासाहेबांनीही वेळोवेळी अमित शहा यांच्या निर्णयांचे कौतुक केले होते. त्यांचं मणिपूरवर पूर्ण लक्ष आहे. त्यामुळे त्यांना अक्कल शिकवण्याऐवजी ज्यांची तुम्ही हाजी करता त्या काँग्रेसने भाजपने हिंदुंच्या संरक्षणासाठी केलेले कायदे एका मागून एक रद्द करण्याचा सपाटा लावला आहे त्याच्याकडे लक्ष द्या. तुमच्या मालकाची त्यांच्या विरुद्ध बोलण्याची हिंमत आणि किंमत आहे का? हे बघा.
हेही वाचा…
मणिपूर, पाकिस्तान आणि चायना बद्दल बोलण्यापेक्षा तुझा मालक आणि तू ज्यांच्या मांडीला मांडीला लावून बसता त्यांनी कर्नाटकमध्ये धर्मांतर विरोधी कायदा रद्द केला त्याबद्दल बोला. त्या कायद्याच्या रद्द करण्यामुळे तिकडच्या हिंदू मुलींच भविष्य धोक्यात आलं आहे त्याकडे लक्ष द्या. कर्नाटकलाच तुम्ही पाकिस्तान बनवण्याचं ठरवलं आहे.
पंतप्रधान नेहरुंवर तुला फार प्रेम येतंय. पण याच नेहरुंनी मी अपघाताने हिंदू आहे असं म्हटलेलं. त्याचं तुम्ही समर्थन करता. ज्या मोदींनी या आधीच्या पंतप्रधानांना मान मिळवून दिला जो काँग्रेसने कधी दिला नव्हता त्यांच्यावर टीका करण्याची नालायकगिरी तुम्ही करता? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…