मुंबईच्या धर्तीवर 'ठाणे शहर विकास समिती' स्थापन करा; उपमहापौर कृष्णा पाटील यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र

ठाणे: ठाणे शहराचा वाढता विस्तार आणि नागरी गरजा लक्षात घेता, मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर ठाण्यातही 'ठाणे शहर विकास समिती' नियुक्त करण्यात यावी, अशी आग्रही मागणी ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदन पाठवले आहे.



पारदर्शक विकासासाठी समितीची गरज


पत्राद्वारे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी शासनाचे लक्ष वेधले की, ठाणे शहर सध्या झपाट्याने विस्तारत असून महानगराच्या समस्याही तितक्याच जटील होत आहेत. केवळ सिमेंट-काँक्रीटची जंगले न उभारता शहराचा विकास सर्वसामान्य ठाणेकरांना केंद्रस्थानी ठेवून होणे आवश्यक आहे. मुंबई महानगरपालिकेत शहर विकासासाठी ज्याप्रमाणे विशेष समिती कार्यरत आहे, त्याच धर्तीवर ठाण्यातही तज्ज्ञांची समिती असणे ही काळाची गरज बनली आहे.



समितीची प्रमुख उद्दिष्टे


उपमहापौरांनी या प्रस्तावित समितीच्या माध्यमातून पाच प्रमुख उद्दिष्टे मांडली आहेत.


विकास आराखडा (DP) नियंत्रण: शहराच्या डेव्हलपमेंट प्लॅनवर बारीक लक्ष ठेवून त्याची पारदर्शक अंमलबजावणी करणे.



जनहितकारी धोरणे: बिल्डरधार्जिण्या निर्णयांना चाप लावून सर्वसामान्यांच्या हिताची गृहनिर्माण धोरणे राबवणे.



भ्रष्टाचार निर्मूलन: शहर विकास विभागातील भ्रष्टाचाराला लगाम लावून कामात पारदर्शकता आणणे.



ज्वलंत प्रश्नांवर तोडगा: अनधिकृत बांधकामे, फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि वाहतूक कोंडी यांसारख्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधणे.



हॅपी इंडेक्समध्ये वाढ: नागरी सोयीसुविधांचा दर्जा सुधारून ठाणेकरांचे जीवनमान उंचावण्यावर भर देणे.



राज्य सरकारकडे सकारात्मक निर्णयाची अपेक्षा


ठाणे हे सर्वांच्या जिव्हाळ्याचे शहर असून, शहर विकास विभागाकडून दर्जेदार आणि नियोजनबद्ध काम करून घेण्यासाठी अशा तज्ज्ञ समितीची भूमिका निर्णायक ठरेल, असा विश्वास उपमहापौर कृष्णा पाटील यांनी व्यक्त केला आहे. राज्य सरकारने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने प्रशासनाला निर्देश द्यावेत, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. या पत्राची प्रत ठाणे मनपा आयुक्तांनाही पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Nisha Bhagat Fraud Case : प्रसिद्ध मराठी लोकगायिकेविरोधात गुन्हा दाखल; सरकारी नोकरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप

कल्याण : प्रसिद्ध मराठी लोकगायिका निशा भगत आणि अनिल आहिरे यांच्याविरोधात सरकारी नोकरीच्या आमिषाने २० लाख रुपये

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

North Cyprus Ferry Accident : मोठी बातमी! २७० प्रवाशांना घेऊन जाणारी फेरी बोट उलटली; १०० हून अधिक जणांची सुटका, बचावकार्य सुरू

उत्तर सायप्रस : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. २७० प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी

Ankit Baliyan Murder : शामलीत अंकित बलियान हत्या प्रकरणातील दोन संशयित चकमकीत ठार; पोलीस कर्मचारीही जखमी

शामली :  उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात हरियाणवी गायक आणि यूट्यूबर अंकित बलियान यांच्या हत्या प्रकरणातील दोन

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस