Saturday, April 19, 2025
Homeक्रीडाआयपीएल गाजवणारे 'हे' दोन युवा खेळाडू आज एकमेकांना भिडणार! कारण....

आयपीएल गाजवणारे ‘हे’ दोन युवा खेळाडू आज एकमेकांना भिडणार! कारण….

पुणे: बहुप्रतिक्षित महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL 2023) टी-२० क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. एमसीएच्या पुण्यातील स्टेडियमवर पुणेरी बाप्पा आणि कोल्हापूर टस्कर्स या लढतीने स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. आज रात्री ८ वाजता हा सामना रंगणार आहे. तर सामन्यापूर्वी सायंकाळी ५.३० वाजता अमृता खानविलकरसह अनेक तारे-तारकांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन सोहळ्याने स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. पुण्याचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करत आहे तर कोल्हापूर संघाची धुरा केदार जाधव याच्या खांद्यावर आहे.

एमपीएलमध्ये सहा संघ १४ दिवस लढणार आहेत. १९ सामन्यानंतर एमपीएलचा विजेता मिळणार आहे. पुणेरी बाप्पा, कोल्हापूर टस्कर्स, ईगल नाशिक टायटन्स, छत्रपती संभाजी किंग्ज, रत्नागिरी जेट्स आणि सोलापूर रॉयल्स हे सहा संघ साखळी (लीग फॉरमॅट) पद्धतीने एकमेकांशी लढत देणार आहेत. २९ जून रोजी स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने पुण्याजवळील गहुंजे येथील एमसीएच्या स्टेडियमवर खेळविले जाणार असून दुपारी २ व रात्री ८ वाजता सामने होणार आहेत. स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी सर्व प्रेक्षकांना विनामूल्य मुक्त प्रवेश असून टेलिव्हिजनवरून दूरदर्शन डीडी वाहिनीवर, तसेच फॅनोड या स्ट्रीमिंगवरूनही हे सामने पाहता येणार आहेत.

दरम्यान, ऋतुराज गायकवाड आणि केदार जाधव आमने सामने येणार असले तरी, अनुभवी नौशाद शेख व अंकित बावणेसह सचिन धस, साहिल औताडे असे युवा खेळाडू असलेल्या कोल्हापूर संघासमोर संतोष जेधे यांचे मार्गदर्शन लाभलल्या पुणे संघाचे आव्हान असणार आहे. पुणे संघात ऋतुराजसह यष्टिरक्षक सूरज शिंदे, पवन शाह, यश क्षीरगासर व अष्टपैलू रोहन दामले यांचा समावेश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -