U turn : शिवसेनेने मारला यु टर्न! आता केली 'अशी' जाहिरात...

मुंबई: काल शिवसेनेच्या (Shiv Sena Advertisement) जाहिरातबाजीवरुन राजकारण चांगलच तापलं असताना आज शिवसेनेनं पुन्हा पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे. मात्र, या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), या दोघांचा फोटो आहे. तसंच, वरच्या बाजूला बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), आनंद दिघे (Anand Dighe), पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (CHM Amit Shaha) यांचे फोटो दिसत आहेत.












कालच्या जाहिरातीत केवळ मोदी आणि शिंदे यांचेच फोटो होते. त्यावरून विरोधकांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली होती. आनंदाच्या क्षणी शिंदे हे बाळासाहेबांना विसरले, अशी टीका उबाठा गटाने केली होती. तसेच, या जाहिरातींमुळे भाजपच्या गोटातही नाराजी आणि अस्वस्थता पसरल्याची चर्चा होती. या सगळ्यावर फुंकर म्हणून शिवसेनेनं आज पुन्हा जाहिरात दिली अशी चर्चा आता रंगू लागली आहे.








आकडेवारी बदलली...


काल शिवसेनेकडून देण्यात आलेल्या जाहीरातीत मुख्यमंत्रीपदासाठी २६.१ टक्के जनतेची शिंदेना तर २३.२ टक्के जनतेची पसंती फडणवीसांना असल्याचा उल्लेख जाहिरातीत करण्यात आला होता. पण आज एकत्रित आकडेवारी देण्यात आली आहे.









Comments
Add Comment

मुंबईत मलेरियाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईत मागील काही दिवसांपासून साथीच्या आजारांमध्ये प्रचंड वाढ होत असून मलेरियाच्या

मुंबईत पावसाचे टार्गेट पूर्ण, आतापर्यंत तब्बल १०३ टक्के पावसाची नोंद

मुंबई (खास प्रतिनिधी) : यंदा पावसाने वेळेआधीच हजेरी लावल्यानंतर ज्या प्रकारे बरसात करत आहे, ते पाहता आता मुंबईतील

दादर पश्चिमेला झाड कोसळलं, चारचाकी थोडक्यात बचावली

मुंबई: दादरच्या पश्चिम येथील पोर्तुगीज चर्च जवळील परिसरात झाड कोसळल्याची घटना घडली आहे. दादरच्या अमर हिंद

काहीही झाले तरी मुंबई महापौर महायुतीचाच असणार- देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहे. नेत्यांच्या

मुंबईत देवींच्या आगमन मिरवणुकांनी परिसर उजळले

मुंबई: शारदीय नवरात्रोत्सवाच्या आधी शहरात सर्वात पूज्य देवींच्या मूर्तींचे उत्साही स्वागत करण्यात आले.

मुंबई मेट्रो स्टेशनच्या खराब डिझाइनवर प्रवासी नाराज

मुंबई: मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पंख्यांची कमतरता असल्याबद्दल 'रेडिट'वरील एका पोस्टनंतर मुंबई मेट्रो