Nitesh Rane : उद्धव ठाकरेंना मिळालेल्या बेस्ट सीएम किताबासाठी कर्जतच्या फार्महाऊसवर सर्व्हे केला का?

  293

भाजप आमदार नितेश राणे यांचा सवाल


मुंबई : महायुतीच्या सरकारबद्दल झालेल्या सर्व्हेवर टीका करण्याआधी खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना दर तीन महिन्यांनी बेस्ट सीएम म्हणून मिळालेल्या किताबासाठी केलेला सर्व्हे कोठे केला होता? हे सांगावे. हे सर्व्हे कर्जतच्या फार्महाऊसवर बसून केले होते का?, असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना केला.


शिंदे सरकारच्या सर्व्हेबद्दल संजय राऊत म्हणाले की, हा सर्व्हे सरकारी बंगल्यात बसून केला होता. त्याला प्रत्त्युत्तर देताना नितेश राणे बोलत होते. उद्धव ठाकरेंमुळे अडीच वर्षे महाराष्ट्र देशोधडीला लागला, पिछाडीला गेला. तरीही उद्धव ठाकरे यांना दर तीन महिन्याने बेस्ट सीएमचा पुरस्कार कसा काय मिळाला? याचा सर्व्हे कर्जतच्या फार्महाऊसवर झाला होता, की डिनो मोरयाच्या घरी, याची माहिती संजय राऊत यांनी द्यावी. दुसऱ्यांचा सर्व्हे आल्यावर तुम्ही जळता. पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे बॉलिवूडच्या कलाकारांना स्वतःची लाल करून घेण्यासाठी दर महिन्याला किती पैसे द्यायचे, याची माहिती मी देऊ का? त्या एजन्सीची माहिती देऊ का? म्हणजे तुम्हालाही कळेल की करोडोंचा पैसा देऊन हे बॉलीवूडचे कलाकार उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची लाल करायचे..., असा सवाल त्यांनी केला.


आमचे सरकार अतिशय सक्षमपणे काम करत आहे. लोकांच्या मनात असलेले काम करत आहे. गतिमान महाराष्ट्र पुढे घेऊन जात आहे. त्यामुळे हे असे सर्व्हे येत आहेत, असेही नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

रवींद्र चव्हाण नवे भाजपा प्रदेशाध्यक्ष, बिनविरोध निवड

भाजपाची कोकणातील ताकद आणखी वाढणार मुंबई : भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी

RailOne ॲप लाँच, आता सर्व सुविधा एकाच जागी मिळणार, तिकीट बुकिंगपासून ते लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आता आनंदाची माहिती आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने एक नवीन

ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू

मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधून रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. यामुळे पिण्याचे पाणी

Devendra Fadanvis : "...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात", CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही'- मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : आज विधानसभेत टोरेस कंपनीच्या (Torres Company)

Maharashtra Monsoon Session 2025 : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ, नाना पटोलेंचे दिवसभरासाठी निलंबन, राहुल नार्वेकर भडकले अन् थेट

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळतंय.

मराठी भाषेबाबत तडजोड, गळचेपी सहन करणार नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली शिवसेनेची भूमिका मुंबई : मराठी भाषेबाबत आपण कधीही तडजोड सहन करणार नाही,