Thursday, May 8, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Cyclone Biparjoy: बिपरजॉय वादळाने धडकण्याच्या आधीच ९ जणांचा घेतला बळी

Cyclone Biparjoy: बिपरजॉय वादळाने धडकण्याच्या आधीच ९ जणांचा घेतला बळी

मुंबई: गुजरातला धडकण्यासाठी बिपरजॉय (Cyclone Biparjoy News) वादळाचा अवघा एक दिवस बाकी आहे. १५ जूनच्या संध्याकाळपर्यंत ते कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ बंदरावर धडकेल. यादरम्यान गुजरात आणि मुंबईच्या किनारी भागात जोरदार वारे आणि उंच लाटांमुळे आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे.


तसेच, जोरदार वाऱ्यामुळे द्वारका येथील द्वारकाधीश मंदिरात काल आणि आज सकाळीही ध्वज बदलता आला नाही. आता १७ जूनपर्यंत नवीन ध्वज लावण्यात येणार नसल्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. मंदिराच्या इतिहासात असे प्रथमच घडत आहे.

Comments
Add Comment