मुंबई : जुहू चौपाटीवर (Juhu Chowpatty) सोमवारी सायंकाळी समुद्रात बुडालेल्या तीन मुलांचे मृतदेह तब्बल २० तासांच्या शोध मोहिमेनंतर सापडले आहेत. परंतु जय रोहन ताजभारिया (१६) याचा शोध अद्याप सुरू आहे.
‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे पर्यटकांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभाग, पालिका प्रशासनाकडून देण्यात आला असतानाही सांताक्रूझ वाकोला येथील पाच मुले जीवरक्षक दल, पोलीस तसेच स्थानिकांची नजर चुकवून समुद्रात गेले. या पाचही जणांना स्थानिकांनी हटकले आणि तेथून निघून जाण्यास सांगितले. मात्र, त्याकडे मुलांनी दुर्लक्ष केले. याचा परिणाम म्हणजे खवळलेल्या समुद्रात ते बुडाले, अशी माहिती स्थानिकांनी दिल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.
ही मुले समुद्रात बुडत असल्याचे निदर्शनास आल्यावर तेथील कोळी बांधवांनी धर्मेश ताजभारिया (१६) याला कसेबसे समुद्राबाहेर काढण्यात यश आले. मात्र, इतर चौघे जण समुद्रात बुडाले.
सोमवारी वाकोला परिसरातील ८ मुलांनी पाऊस पडत असल्याने ते क्रिकेट खेळायला जात आहेत, असे सांगितले. त्यांनी १० ते २० रुपये घेतले. पण ते जुहू चौपाटीवर जात असल्याची माहिती दिली नाही. संध्याकाळी मुले बुडाल्याचे समजले. यापैकी दोघे सख्खे भाऊ आहेत.
मनीष योगेश ओगानिया (१६)
शुभम योगेश ओगानिया (१५)
धर्मेश वालजी फौजिया (१६)
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…