नवी दिल्ली: भारताकडून दुसऱ्यांदा जागतिक कसोटी विश्वचषकाचं (ICC World Test Championship) विजेतेपद हुकल्यानंतर टीम इंडियाच्या (Team India) खेळांडूसह आता सपोर्ट स्टाफवरही (Team India Support Staff) टीका करण्यात येत आहे. बीसीसीआयने भारताच्या पराभवानंतर टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफला इशारा दिला आहे.
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) वनडे वर्ल्ड कप आधी मोठा बदल करण्याची शक्यता आहे. याबाबत बीसीसीआयकडून हालचाली सुरु आहेत. फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांच्याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी याबाबत म्हटलं आहे की, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणे ही सोपी गोष्ट नाही. पण परदेश दौऱ्यांमध्ये संघाची अपेक्षेप्रमाणे कामगिरी झाली नाही. त्यामुळे आगामी वन डे वर्ल्ड कप अवघ्या ४ महिन्यांवर आला असताना याबाबत अंतर्गत पातळीवर चर्चा करुन निर्णय घेतला जाईल.