Sunday, April 20, 2025
Homeदेशयुपीएससी पुर्वपरिक्षेचा निकाल जाहीर, निकाल कसा पाहाल? वाचा सविस्तर...

युपीएससी पुर्वपरिक्षेचा निकाल जाहीर, निकाल कसा पाहाल? वाचा सविस्तर…

नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) २८ मे रोजी घेण्यात आलेल्या पू्र्वपरीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत एकुण १४ हजार ६२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ https://upsc.gov.in वर पाहता येईल. (UPSC Prelims 2023 Result )

या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आता केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा देण्यास पात्र झाले आहेत. या विद्यार्थ्यांना आता मुख्य परीक्षेसाठी पुन्हा अर्ज करावा लागणार आहे. मुख्य परीक्षेसाठी करण्यात येणाऱ्या अर्जाची नियमावली आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी काही प्रश्नपत्रिका देखील त्यानंतर उपलब्ध करुन देण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकराचा संभ्रम निर्माण न करता संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांनुसार प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन आयोगाकडून करण्यात येत आहे.

संबधित बातम्या…..

‘बिपरजॉय’ चक्रीवादळ उत्तरेकडे सरकल्याने राज्यात पोषक वातावरण

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -