Tuesday, May 13, 2025

देशमहत्वाची बातमी

धर्मांतराच्या घटनांनंतर केंद्र सरकारडून ऑनलाईन गेम्सवर कडक कारवाईची तयारी

धर्मांतराच्या घटनांनंतर केंद्र सरकारडून ऑनलाईन गेम्सवर कडक कारवाईची तयारी

नवी दिल्ली: ऑनलाईन गेम्सच्या (Online Games) माध्यमातून होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांनंतर आता केंद्र सरकार ऑनलाईन गेम्सवर कठोर पावलं उचलणार आहे. केंद्र सरकार सध्या तीन प्रकारच्या ऑनलाईन गेम्सवर बंदी घालण्याची तयारी करत आहे. या गेम्सवर बंदी घालण्यासाठी केंद्राकडून नियमावली ठरवण्यात आली आहे.


केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याबाबत अधिक माहिती देताना म्हटले की, आम्ही ऑनलाईन गेम्सच्या संदर्भात एक नियमावली तयार केली आहे. त्याअंतर्गत आम्ही तीन प्रकारच्या गेम्ससाठी परवानगी देणार नाही. यामध्ये सट्टेबाजी असलेले गेम्स, ज्या गेम्समुळे नुकसान होऊ शकते आणि ज्या गेम्सचे व्यसन लागू शकते, अशा प्रकारच्या गेम्सवर बंदी घालण्यात येईल.


नुकतचं गाझियाबादमध्ये ऑनलाईन गेम्सच्या माध्यमातून धर्मांतर झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणाचे थेट कनेक्शन महाराष्ट्राशी आहे. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आता केंद्राकडून कठोर पावलं उचलण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेमुळे अशा प्रकरणास आळा बसण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन गेम्सचे मुलांना लागणारे व्यसन या दृष्टीने देखील केंद्राचं हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं म्हटलं जात आहे.




Comments
Add Comment