मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काल सोशल मिडीयावर धमकी देण्यात आली होती. ही धमकी सौरभ पिंपळकर नावाच्या एका व्यक्तीच्या ट्विटर हॅंडलवरुन आल्याचे समोर आले होते. ही व्यक्ती भाजपचा अमरावतीतील कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत होते. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सौरभ हा भाजपचाच कार्यकर्ता असल्याचे मान्य केले. मात्र सौरभने कोणत्याही प्रकारची धमकी दिलेली नाही, असा दावा त्यांनी केला. ‘धमकी देणे भाजपच्या रक्तात नाही’ या कालच्या वक्तव्यावर ते ठाम असल्याचे दिसून येत आहे.
कुठलेही रेकॉर्ड काढून तपासा सौरभ पिंपळकरने शरद पवार साहेबांना धमकी दिलेली नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. धमकी वेगळ्या अकाऊंटवरुन आहे, त्यामुळे त्याला सपोर्ट करणंदेखील वाईट आहे आणि त्याचं आम्ही समर्थन करत नाही, असं ते म्हणाले. तसेच मागच्या अडीच वर्षांत मविआच्या काळात देवेंद्र फडणवीसांबद्दल याहून वाईट, धमकीवजा अश्लील भाषेत मोठ्या प्रमाणावर जे लिहिलं गेलं त्यावरदेखील कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे.
‘कल्याण-डोंबिवली मतदारसंघात भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांत सगळं काही आलबेल नाही आहे’ या खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी भाजप-सेना युती घट्ट असल्याचं ते म्हणाले. याबाबत बैठक घेणार असून आम्ही शिंदे गटाला ताकद देऊ आणि श्रीकांत शिंदेंना यावेळी जास्त मतांनी निवडून आणू, असं ते म्हणाले.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…