भारत आणि ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यावर पावसाचे सावट!

ऑस्ट्रेलियन चाहत्यांची चिंता वाढली तर भारतीय चाहत्यांना झाला आनंद


लंडन : लंडनमधील ओव्हल क्रिकेट मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जात आहे. या जेतेपदाच्या लढतीत तीन दिवस खेळले गेले असून चौथ्या आणि पाचव्या दिवशीच्या खेळीवर पावसाचे सावट निर्माण झाले आहे. येथील स्थानिक हवामान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, आजपासून पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे ऑस्ट्रेलियन चाहत्यांची चिंता वाढली असून भारतीय चाहत्यांना मात्र आनंद झाला आहे.


चौथ्या दिवसाचा खेळ लंडनच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता आणि भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होईल. ऑस्ट्रेलियन संघ आज भारतासमोर मोठे लक्ष्य ठेवू इच्छितो. परंतू Accuweather या हवामान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, केवळ चौथ्या दिवशीच नाही तर पाचव्या दिवशी आणि सोमवारी राखीव दिवशीही पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.


आज चौथा दिवस असून दिवसभरात ५५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारी ३.८८ मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच वादळी वाऱ्याची शक्यता आहे. त्याचवेळी, सुमारे एक तास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय लंडनमध्ये शनिवारी दुपारी २ ते ९ या वेळेत वादळाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


त्यामुळे चालू असलेल्या सामन्यावर नजर टाकली तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्राच्या खेळावर याचा परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे, शनिवारनंतर रविवारी लंडनमध्ये ८८ टक्के पाऊस आणि सोमवारी ८० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा खेळावर परिणाम होऊ शकतो.


मात्र ड्रेनेजची व्यवस्था चांगली असल्याने दिवसभर वाहून जाण्याची शक्यता कमी आहे. मात्र दोन दिवसांत काही शक्य झाले नाही तर सहाव्या दिवशी निकालासाठी सामना होणार आहे.

Comments
Add Comment

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने