नाशिक: थेट कायदेशीर नोटरी करून प्रत्येक महिन्याला कंत्राटदारकडून वीस हजार रुपये देण्याची हमी मिळविण्याचे बेकायदेशीर काम करणाऱ्या एका कथित वृक्ष प्रेमी वर गंगापूर रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या संदर्भात गंगापूर रोड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नितीन कोठावदे यांचे महापालिका हद्दीत वृक्ष तोडण्याचे कंत्राट आहे. हे कंत्राट राबवितांना त्याच्या कामाविषयी मनपा प्रशासनाकडे तक्रार करू नये म्हणून एका तरुणाने कोठावदे यांच्याकडे प्रत्येक महिन्याला वीस हजार रुपयांची मागणी केली. हा तरुण केवळ मागणी करून थांबला नाही तर थेट नोटरी करून तशी हमीच घेतली. नोटरीची प्रत ताब्यात मिळताच कंत्राटदार कोठावदे यांनी थेट गंगापूर रोड पोलिस ठाणे गाठून आपली कैफियत मांडली. गंगापूर रोडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. कोठावदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३८५ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले आहे. दरम्यान आरोपीची न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली आहे.
दरम्यान, याबाबत तपासी अंमलदार सहायक पोलिस निरीक्षक महेश येसेकर यांनी आरोपीकडून नोटरीची मूळ प्रत जप्त करून शहनिशा केली जाईल. त्यानंतर पुढील तपास करून निर्णय घेतला जाईल असे दैनिक प्रहारशी बोलतांना सांगितले.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…