पुणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसची धूरा आता महिलांच्या हातात देण्यात आली असून इतिहासामध्ये पहिल्यांदा एका महिलेने सासवड ते नीरा मार्गावर बस चालविली. अर्चना अत्राम असे पहिल्या एसटी बस चालकाचे नाव आहे. त्यांनी सासवड ते नीरा (जेजुरी मार्गे) या मार्गावर गुरूवारी बस चालविली.
एसटी महामंडळामध्ये महिला वाहक म्हणून काम करतात. पण, अद्यापर्यंत महिला चालक एसटी महामंडळात नव्हत्या.
अत्राम यांनी बस चालविल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. याबद्दल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्टिवट करून अत्राम यांचे अभिनंदन केले.
चाकणकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘नवी जबाबदारी तुझी, एसटी प्रवाशांना सुरक्षित घरी पोहोचवण्याची… आजच्या दिवशी महाराष्ट्रातील एसटीच्या इतिहासात राज्यातील पहिल्या महिला एसटी चालक मा. अर्चना अत्राम यांच्या नावाने इतिहास लिहिला गेला आहे. त्यांनी सासवड ते नीरा दरम्यान जेजुरी मार्गे बस चालवली. राज्य महिला आयोगाच्या वतीने पहिल्या एसटी महिला चालक मा. अर्चना आत्राम यांचे मनःपूर्वक अभिनंदन.’
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…
१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…
देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…