मुंबई: सध्या राजकारण्यांची टीका करण्याची पातळी घसरली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचाच प्रत्यय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या सुरू असलेल्या ट्विटर युद्धावरुन दिसून आला. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चित्रा वाघ यांच्यावर केलेल्या खालच्या पातळीवरील टीकेनंतर चित्रा वाघ यांनी देखील याला जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेताना आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्यावर भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी टीका केली होती. अशा व्यक्तींना वेळीच आवर घाला असे त्या म्हणाल्या होत्या. यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आवड यांनी मात्र आपली पातळी सोडली. त्यांनी ‘हमाम में सब नंगे है’…… आणि ‘अँटी चेंबरमधील विनोद’ असे म्हणत चित्र वाघ यांच्यावर टीका केली. तर याला चित्रा वाघ यांनी देखील प्रत्युत्तर देत म्हटले की, ‘उत्तर नसतं तेव्हा स्त्रीची बदनामी हे तुमचा शस्त्र असतं’ असा हल्ला चढवला आहे.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…