नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएलपाठोपाठ आता आशिया चषक आणि आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे सामनेही मोबाईलवर विनामूल्य पाहता येणार आहेत. आयपीएलच्या विक्रमी प्रेक्षकसंख्येनंतर डिस्ने स्टारने हा निर्णय घेतला आहे. हॉटस्टार अॅपवर हे सामने फ्री पाहता येतील.
कंपनीचा दावा आहे की ५४० दशलक्षाहून अधिक मोबाइल वापरकर्त्यांना याचा फायदा होईल, ते विनामूल्य मोबाइलवर सामना पाहू शकतील.
आशिया चषक पाकिस्तानात होणार होता, पण सुरक्षेच्या दृष्टीने बीसीसीआयला आपला संघ तिथे पाठवायचा नाही. त्यामुळे आशिया चषक पाकिस्तानच्या बाहेर होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
क्रिकेट विश्वचषक २०२३ भारतात होणार आहे, जो ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान खेळला जाणार आहे. विश्वचषकाला चार महिनेही बाकी आहे.