सांगली जिल्ह्यात आतापर्यंतचा सगळ्यात मोठा दरोडा

रिलायन्स ज्वेल्स शोरुममधून तब्बल १४ कोटींचे दागिने लंपास


सांगली : सांगली जिल्ह्यात मिरज येथे मार्केट यार्ड चौकावरील रिलायन्स ज्वेल्स शोरुममध्ये काल दुपारी तीनच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. भरदिवसा पडलेल्या या दरोड्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. यात दरोडेखोरांनी सोन्याचे व हिर्‍याचे तब्बल १४ कोटींचे दागिने लंपास केले. हे दरोडेखोर परराज्याचे असल्याची माहिती मिळत आहे. सांगली जिल्ह्यातील आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा दरोडा आहे.


घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ताबडतोब घटनास्थळी पोहोचले आणि तपासाला सुरुवात केली. सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दरोडेखोरांची टोळी पकडण्यात अजून यश आलेले नाही. पोलिसांची सात पथके यासाठी तयार करण्यात आली आहेत. इतर जिल्ह्यांतील पोलिसांचीदेखील या कामी मदत घेतली जात आहे.


या घटनेत सुरुवातीला ४ ते ५ जण ग्राहक असल्याचे सांगत रिलायन्स ज्वेल्स शोरुममध्ये गेले. त्यांनी सगळ्या कर्मचार्‍यांना एकत्रित करुन त्यांचे हातपाय बांधले. मॅनेजरलाही धमकावण्यात आले. त्यातील दोन कर्मचार्‍यांना दागिने पिशवीत भरण्यास सांगितले. त्यानंतर हे दरोडेखोर शोरुमच्या बाहेर निघताना आत जाणार्‍या काही ग्राहकांसोबत त्यांची झटापट झाली आणि गोळीबारदेखील झाला. यात एका ग्राहकाने शोरुमच्या बाहेर येण्याचा प्रयत्न केला असता तो जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.


हे चोरटे दोन गाड्यांमधून पळाल्याचे समजत आहे, त्यामुळे साधारण ८ ते १० जणांची टोळी असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. अजून या घटनेसंदर्भात सविस्तर धागेदोरे हाती लागलेले नसले तरी ही टोळी परराज्यातूनच आलेली असावी असा पोलिसांचा दाट निष्कर्ष आहे.

Comments
Add Comment

Airport Job Fraud : विमानतळावरील नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक; परीक्षा केंद्रावर पोहोचताच झाला प्रकार उघड

छत्रपती संभाजीनगर : विमानतळावर आकर्षक पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील अनेक सुशिक्षित

Kolhapur News : कोल्हापूरच्या विकासाला मोठी चालना; 1850 कोटींच्या विकासकामांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील विविध विकासकामांना मोठी चालना मिळाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis)

Pune Airport : पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ , संमतीपत्र न दिल्यास सक्तीने संपादन

पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित ‘छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांच्या

Baramati Plane Accident : बारामतीमध्ये सात महिन्यांत तिसरा विमान अपघात, प्रशिक्षण विमानानं धावपट्टी सोडली आणि झाला अपघात

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामतीत यंदाच्या वर्षातला तिसरा विमान अपघात झाला आहे. ताजी घटना आज म्हणजेच रविवार ९

Pune Pub Raid : पहाटे ३ वाजेपर्यंत पार्टी रंगणाऱ्या पबवर पोलिसांची धाड! ८० ते १०० तरुण-तरुणी ताब्यात

पुणे : पुण्यातील पब आणि क्लबमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या घटना पुन्हा चर्चेत आल्या आहेत. विमानतळ

Sindhudurg : प्रशासन प्रभावीरित्या राबवण्यासाठी AI वापरणारा सिंधुदुर्ग देशातील पहिला जिल्हा, जाणून घ्या कसा केला AI चा वापर ?

मालवण : एआय म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता. अनेकांना वाटतं की एआय हे बड्या