
लंडन (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडच्या ओव्हल मैदानात होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ लंडनमध्ये कसून सराव करत आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने इंग्लंडमधील सरावाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
७ जूनपासून या बहुप्रतिक्षीत अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्याला चार दिवस शिल्लक असून दोन्ही संघ जोरदार सराव करत आहेत. भारताचा पूर्ण संघ लंडनमध्ये पोहचला असून प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली मैदानात घाम गाळत आहे. विराट कोहली जीवतोड मेहनत घेत आहे. संघातील अन्य खेळाडूही मेहनतीत मागे नाहीत.