कणकवली: संजय राऊत यांनी काल खासदार श्रीकांत शिंदे तसेच संजय शिरसाट यांच्यावरुन पत्रकारांनी प्रश्न विचारला असता थुंकण्याचे कृत्य केले. यावर नितेश राणे यांनी त्यांचा समाचार घेत संजय शिरसाट यांचं नाव दलित समाजातून येतं. त्यांच्यावर देखील ते थुंकलेत. त्यामुळे, राऊतांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.
नितेश राणे यांनी त्यांच्या खास शैलीत संजय राऊत यांचा समाचार घेत, संजय राऊत यांची जीभ सध्या वळवळते आहे. मुंबईतील एक महिला संजय राऊत यांच नाव घेतल्यावर अशीच थुकते. त्यामुळे संजय राऊत यांनी थुकण्याचे प्रकार बंद केले नाहीत तर सरकारला मी विनंती करतो की संजय राऊत यांचे संरक्षण काढावे आणि त्यानंतर त्याची जीभ किती वळवळते हे आपण पाहू, असे म्हटले.
ते पुढे म्हणाले संजय राऊत हे खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे यांच्यावर थुकले आहेत. ज्या मालकाच्या पगारावर याचं घर चालत ते पवार साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांना वर्षावर भेटले. हे सरकार झाल्यापासून सुप्रीम कोर्टाचा निकाल मान्य नाही हे म्हणण्याऱ्या त्यांच्या मालकावरच ते थुंकले आहेत. तुमची महाविकास आघाडीमध्ये काय किंमत आहे हे काल शरद पवार यांनी दाखवून दिले आहे.
यावेळी त्यांनी संजय राऊत यांचा राजकीय लव्ह जिहाद झाला आहे, असे म्हटले. ज्या राहुल गांधींचे ते तळवे चाटतात त्यांनी काल मुस्लीम लीगला सेक्युलर म्हटलं आहे. तुमच्यासारख्या टेबल पत्रकारांनी मुस्लीम लीगचा इतिहास वाचावा. भाजपवर थुकण्याचं कृत्य करता मग सामनाच्या पहिल्या पानावर जाहीरात का घेतली असा सवाल त्यांनी उपस्थित केली आहे.
नवी दिल्ली : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने देश हादरून गेला असतानाच, केंद्र सरकारने…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे.…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, मोदी सरकारने पाकिस्तान संबंधित राजकीय, आर्थिक आणि राजनैतिक आघाड्यांवर काही…
१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली २३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष…
पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…