कोकण मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसचा ठरला मुहूर्त; जाणून घ्या वेळापत्रक...

मुंबई : आताच्या घडीला देशात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली वंदे भारत एक्स्प्रेस आता मुंबई-गोवा मार्गावर सुरू करण्यात येत आहे. कोकण रेल्वेवरील वंदे भारतला येत्या शनिवारी, म्हणजेच ३ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यानंतर, ५ जूनपासून ही गाडी प्रवाशांच्या नियमित सेवेसाठी दाखल होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसबाबत रेल्वे प्रवासी तसेच पर्यटकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी मडगाव स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर एकवरून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सकाळी साडेदहा वाजता ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. मुंबई गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आठ डब्यांची असल्याचे सांगितले जात आहे. १६ मे रोजी मुंबई-गोवा कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारतची चाचणी घेण्यात आली होती. ती यशस्वी झाल्यानंतर आता वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. दरम्यान, वंदे भारतच्या तिकीट दरांबाबत अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही.


मुंबईकरांना मिळणारी ही चौथी वंदे भारत ट्रेन असून ती आठवड्याला सहा दिवस चालवण्याचे ठरवण्यात आले आहे. शुक्रवारी ही सेवा बंद राहील, असे सांगण्यात आले आहे. तेजस एक्स्प्रेसपेक्षा जलद धावणारी ही ट्रेन कोकण मार्गावरील सर्वात जलद एक्स्प्रेस असणार आहे. यातच आता वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक समोर आले आहे. मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईतून कधी सुटणार, गोव्यातून परतीचा प्रवास कधी असेल, तिचे थांबे कुठे असतील, याबद्द्ल सविस्तर...



मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक


मुंबई ते मडगाव थांबे आणि वेळ




  • CSMT - पहाटे ५ वाजून २५ मिनिटे

  • दादर - पहाटे ५ वाजून ३२ मिनिटे

  • ठाणे - पहाटे ५ वाजून ५२ मिनिटे

  • पनवेल - सकाळी ६ वाजून ३० मिनिटे

  • रोहा - सकाळी ७ वाजून ३० मिनिटे

  • खेड - सकाळी ८ वाजून २४ मिनिटे

  • रत्नागिरी - सकाळी ९ वाजून ४५ मिनिटे

  • कणकवली - सकाळी ११ वाजून २० मिनिटे

  • थिविम - दुपारी १२ वाजून २८ मिनिटे

  • मडगाव - दुपारी ०१ वाजून १५ मिनिटे


मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक


मडगाव ते मुंबई थांबे आणि वेळ




  • मडगाव - दुपारी ०२ वाजून ३५ मिनिटे

  • थिविम - दुपारी ०३ वाजून २० मिनिटे

  • कणकवली - दुपारी ०४ वाजून १८ मिनिटे

  • रत्नागिरी - सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटे

  • खेड - रात्री ०७ वाजून ०८ मिनिटे

  • रोहा - रात्री ०८ वाजून २० मिनिटे

  • पनवेल - रात्री ९ वाजता

  • ठाणे - रात्री ०९ वाजून ३५ मिनिटे

  • दादर - रात्री १० वाजून ०५ मिनिटे

  • CSMT - रात्री १० वाजून २५ मिनिटे


Comments
Add Comment

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते